आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी घेतला मुलांचा शोध

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला - "शाळा आहे आमची किती छान, आम्ही रोजच शाळेत येणार' हे गीत प्रत्येक विद्यार्थ्याने गुणगुणायला हवे. त्यादृष्टीने जिल्ह्यातील एकही बालक शाळेपासून वंचित राहणार नाही, या संकल्पनेने खुद्द जिल्हाधिकारी जी. श्रीकांत मुख्य कार्यकारी अधिकारी एम. देवेंदर सिंह यांनी शाळाबाह्य विद्यार्थ्यांचा शनिवारी शोध घेतला.

काही शाळाबाह्य मुले गावातच नव्हे, तर शहरातील ओसाड वस्त्यांमध्ये फिरत असल्याचे चित्र पाहावयास मिळाले. ही बाब हेरून जिल्हाधिकारी सीईओ यांनी शाळाबाह्य मुलांना शोधून त्यांना शाळेत भरती करण्याची मोहीम आखली होती. त्यांनी उपविभागीय अधिकारी प्रा. खडसे, शिक्षणाधिकारी अशोक सोनवणे, जिल्हा माहिती अधिकारी युवराज पाटील यांना सोबत घेऊन गावशिवारातील तांडा, वस्त्यांमध्ये फेरफटका मारला असता, त्यांच्यासमोर हे धक्कादायक वास्तव समोर आले. शिवर, एमआयडीसी, कोठारी, तापडिया, हिंगणा यांच्या खदानीवरील मजुरांच्या घरी जाऊन शाळाबाह्य मुलांच्या पालकांचे समुपदेशन केले. शिवर एमआयडीसीमध्ये गुजरातहून आलेल्या कारागिरांची कच्ची वसाहत आहे. त्यांचा गोरक्षण आणि दुधाचा व्यवसाय आहे. अचानक त्यांच्या वसाहतीच्या समोर गाडी थांबवून जिल्हाधिकांनी थेट त्यांच्या वसाहतीत प्रवेश केला. शाळेत कोण कोण जातं, कोण जात नाही, याची चौकशी केली असता पम्मी नावाची वर्षांची मुलगी शाळेत जात नाही, हे त्यांना समजले. त्यांनी त्या मुलीच्या आई-वडिलांना बोलावून घेतले. तिच्या जिभेची समस्या असल्यामुळे ती शाळेत जात नाही, ही सबब पालकांनी पुढे केली. जिल्हाधिकांनी ही मुलगी शाळेत गेली, तर इतर मुलांबरोबर बोलून तिचा आत्मविश्वास वाढेल. तसेच ती शाळेत आली, तर तिची आरोग्य तपासणी होऊन तिच्यावर शासकीय स्तरावर योग्य तो उपचारही केला जाईल, याची ग्वाही दिली. यानंतर आई-वडिलांनी शाळेत पाठवण्याची तयारी दर्शवली. कोठारी खदान भागातील काही पालकांची भेट घेतली. मुलांचे नाव तेथील स्थानिक शाळेत आहेत. पालक इकडे आल्यामुळे तेही इकडे आले आहेत. त्या मुलांना तिकडे तरी शाळेत पाठवा अन्यथा शिवरच्या शाळेत पाठवा म्हणून श्रीकांत यांनी आग्रह केला.

३०० मुलांसोबत साधला संवाद
शोधमोहीम जिल्हाधिकारी मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या मार्गदर्शनात राबवली. यामध्ये जवळपास ३०० पेक्षा जास्त मुलांसोबत विविध पथकांनी संवाद साधला. त्यांना कोणती शाळा जवळ पडेल, याची माहिती घेतली.

संपूर्ण जिल्ह्यामध्ये शोधमोहीम
जुलैरोजी संपूर्ण जिल्ह्यात सकाळी ते सायंकाळी या वेळेत ते १४ वर्षे वयोगटातील शाळाबाह्य मुलांचे सर्वेक्षण करण्यात आले. या उपक्रमांतर्गत प्रत्येक कुटुंबाला भेट दिली. शासनाच्या विविध संघटनांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला.

प्रत्येक मुलाची दक्षता घ्या
खदानअसेल अथवा कोणतेही असे उद्योग असोत तेथील मालकांनी कामगारांची मुलं शाळेत जातात का, हे पाहिले पाहिजे, नसतील तर त्यांना तसे प्रोत्साहन देणे गरजेचे असल्याची भावना जिल्हाधिकांनी या वेळी बोलून दाखवली.

एसडीओंवर मुलीची जबाबदारी
पाचवर्षीय मुलीला तत्काळ कपडे, शासकीय वसतिगृहासह शाळेची व्यवस्था करण्याची सूचना जिल्हाधिकांनी उपविभागीय अधिकारी संजय खडसे यांना केली. सोमवारी सर्व कार्यवाही पूर्ण झाल्याचे कळवावे, असे आदेशही दिले.

१५० गावांत होणार मुलांचे सर्वेक्षण
अकोला तालुक्यातील ६३, ७९८ कुटुंबामध्ये जुलै रोजी शाळाबाह्य विद्यार्थ्यांचे सर्वेक्षण झाले. शाळेपासून वंचित मुलामुलींना शिक्षणाच्या मुळ प्रवाहात आणण्यासाठी सुरू असलेल्या उपक्रमांतर्गत हे सर्वेक्षण तालुक्यातील १५० गावांत करण्यात येणार आहे.

येथे होणार सर्वेक्षण
- बसस्थानक
- वीटभट्टी
-बांधकामे
- सार्वजनिक स्थळे
- मंदिरे