आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Women Politician News In Marathi, Lonar, Sindakhedraja, Divya Marathi

लोणार, सिंदखेडराजा पालिकेत ‘महिलाराज’

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लोणार - लोणार व सिंदखेडराजा नगर पालिकेच्या अध्यक्षांची निवड आज करण्यात आली. या दोन्ही नगर पालिकेवर अध्यक्षपदी महिला निवडून आल्या आहेत. लोणारमध्ये नगराध्यक्षपदी रंजना मापारी यांची, तर उपाध्यक्षपदी शेख समद शेख अहमद यांची अविरोध निवड करण्यात आली. तर सिंदखेडराजा अध्यक्ष नंदा मेहेत्रे तर चंदू साबळे उपाध्यक्ष निवडून आले.
लोणार पालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीत काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसने सत्ताधारी शिवसेनेला पराभूत करत 12 जागा मिळवल्या होत्या. नगराध्यक्षपदासाठी माजी उपाध्यक्ष राजेश मापारी यांच्या पत्नी रंजना मापारी यांच्या नावाची चर्चा होती, तर उपाध्यक्षपदासाठी शेख समद यांच्या नावाला 6 एप्रिल रोजी हिरवी झेंडी मिळाली. निवडणुकीदरम्यान केवळ दोनच अर्ज आल्याने रंजना मापारी यांची अध्यक्षपदी तर शेख समद उपाध्यक्ष अविरोध विजयी झाले. तर स्विकृत सदस्य म्हणूान गजानन खरात, अंबादास इंगळे यांची निवड करण्यात आली. प्रभाकर बेंडे, पी.ए. सोनवणे यांनी काम केले.
सिंदखेडराजात सेनेचा झेंडा
सिंदखेडराजा नगर परिपदेची अध्यक्ष, उपाध्यक्ष पदाची निवडणूक सोमवार 7 एप्रिल रोजी पार पडली. यामध्ये शिवसेनेच्या नंदा मेहेत्रे यांची नगराध्यक्ष पदी तर चंदू साबळे यांची उपाध्यक्षपदी निवड झाली. यावेळी नगराध्यक्ष पदासाठी शिवसेनेकडून नंदा मेहेत्ने यांचा अर्ज होता व राष्ट्रवादीकडून सीमा शेवाळे यांचा अर्ज होता. उपाध्यक्ष पदासाठी शिवसेनेचे चंदु साबळे व भाराकॉ च्या जयर्शी जाधव यांचा अर्ज होता. यावेळी हात उंचावून मतदान घेण्यात आले. यावेळी नंदा मेहेत्रे यांना 9 मते मिळाली व विजयी घोषित करण्यात आले. सीमा शेवाळे यांना 8 मते मिळाली. उपाध्यक्ष पदासाठी भाराकाँच्या जयर्शी जाधव यांनी अर्ज मागे घेतल्यामुळे चंदु साबळे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. गट नेते पदी सिताराम चौधरी यांची वर्र्णी लागली तसेच नाम निर्देषित सदस्य म्हणून राजेंद्र अंभोरे यांची निवड करण्यात आली.