आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बेरोजगारीवर मात, महिलांनी सुरू केलाय गाेडंबीचा व्यवसाय

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
गोडंबी तयार करण्यासाठी बिबेे फोडताना भानखेड येथील महिला, तसेच तयार झालेली गोडंबी.
चिखली- तालुक्यातीलदीड हजार लोकवस्तीच्या भानखेड गावामध्ये बिब्यामधील गोडंबी काढून बाजारामध्ये विकण्याचा व्यवसाय फार वर्षांपासून केला जातो. आज मात्र येथील युवकांनी याच व्यवसायाला मुख्य स्वरूप देत परराज्यात भानखेडची गोडंबी पोहोचवण्याचे काम मोठ्या प्रमाणात चालवले आहे.

बिबे म्हटले की अंगावर शहारे येतात. याच बिब्याचे तेल औषधी म्हणून उपयुक्त असले तरी ते तेल अंगावर पडल्यास त्या ठिकाणी भाजून काळा डाग पडतो, त्यामुळे हे बिबे फोडण्याचे काम करायचे कुणी? हा या व्यावसायिकांसमोर पडलेला यक्ष प्रश्न सोडवताना त्यांनी गावातील बेरोजगार महिला जमा करून व्यवसाय सुरू केला.

महिलादिवसाकाठी मिळवतात २४० रुपये रोजंदारी
महिलांनाहकिकत सांगितल्यानंतर त्यांनीही संसार फुलवण्यासाठी हे जिकिरीचे काम करण्यास होकार दिला आणि व्यवसाय सुरू झाला. गावातील महिलांना सुरुवातीला रोजंदारीने काम देण्यास सुरुवात केली. मात्र, काम कमी होत असल्यामुळे त्या महिलांना नंतर किलोप्रमाणे गोडंबी फोडण्यास दिली. यामधून किलोमागे १२० रुपये अशा प्रकारे एक महिला दोन किलो गोडंबी फोडते, त्यातून त्या महिलांना २४० रुपये रोज पडतो.

गावातील९० टक्के नागरिकांना मिळाला गावातच रोजगार
गावातीलजवळपास ९० टक्के लोक हा व्यवसाय करीत असल्यामुळे गावातच रोजगार निर्मिती होऊन गावातील बेरोजगार महिलांची भटकंती थांबली अाहे. बिबे फोडत असताना आवश्यक ती काळजी घेतातच, परंतु असे असतानाही त्यांच्या शरीराला बिब्याचे तेल उडून जखमा झाल्याचे आढळून येते.

वृक्षतोडीमुळेझाला परिणाम
व्यवसायसुरू केला त्या वेळी परिसरात मोठ्या प्रमाणात बिब्यांची झाडे होती. त्यामुळे बिबे सहज उपलब्ध होत होते. आता मात्र झाडे तोडण्याचे प्रमाण वाढले. लागवड झालीच नाही. त्यामुळे हा व्यवसाय संपतो की काय, असे वाटत असतानाच येथील युवा व्यावसायिकांनी परराज्यात जाऊन बिबे खरेदी करण्यास सुरुवात केली. यामध्ये ओडिशा, आंध्र प्रदेश, कर्नाटक या ठिकाणाहून बिबे बोलावण्यास सुरुवात केली आणि पुन्हा हा व्यवसाय भरभराटीला आला.
कोलकाता, खंडवा, औरंगाबाद, बऱ्हाणपूर, पुणे येथे पाठवली जाते
परराज्यातून ज्या प्रकारे बिबे बोलावल्या जात, अगदी त्याच प्रकारे बिबे फोडून त्यामधून निघणारी गोडंबी ही कोलकाता, खंडवा, औरंगाबाद, बऱ्हाणपूर, पुणे या शहरात पाठवली जाते, तर टरफलाची भट्टी लावून तेल काढण्यात येते. ते तेल २५ रुपये लिटरने पेंट बनवणाऱ्या कंपनीला पाठवण्यात येते. अशा प्रकारे दरवर्षी या गावामध्ये लाखो रुपयांची उलाढाल आहे. बिबे फोडण्याचा व्यवसाय येथील पाच ठिकाणच्या समूहाने सुरू केला आहे.अशा प्रकारचे बिबे फोडण्याचे व्यवसाय भानखेडसह परिसरामधील भोकर, जांभोरा, रायपूर, रुईखेड, मायंबा, लोणार आणि मराठवाड्यातील काही गावांतही सुरू असल्याचे व्यावसायिक राजाराम देवकर यांनी सांगितले.
बातम्या आणखी आहेत...