आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

डिजिटलायझेशनची अंमलबजावणी करून पटकावला मान

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला - डिजिटल कागदपत्रे ही काळाची गरज बनली अाहे. यादृष्टीने गतिमान पारदर्शक प्रशासन राबवण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून जे प्रयत्न सुरू आहेत, ते खरोखरच गौरवास्पद आहेत. यामुळे शासनाचा दर्जा वाढून लोकाभिमुख प्रशासन निर्माण होऊ शकेल, असा विश्वास कामगार विभागाचे प्रधान सचिव तथा जिल्ह्याचे पालक सचिव बलदेव सिंह यांनी व्यक्त केला.
तहसील कार्यालयात २५ जून रोजी संगणकीकृत कोतवाल बुक नक्कल वितरण शुभारंभप्रसंगी ते बोलत होते. या वेळी जिल्हाधिकारी जी. श्रीकांत, मुख्य कार्यकारी अधिकारी एम. देवेंदर सिंह, उपविभागीय अधिकारी प्रा. संजय खडसे, तहसीलदार संतोष शिंदे, जिल्हा माहिती अधिकारी युवराज पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. जिल्हाधिकारी जी. श्रीकांत म्हणाले की, विदर्भात कोतवाल बुकाची नक्कल हा महत्त्वाचा दस्तऐवज आहे. त्यामुळे २०११ मध्ये तत्कालीन जिल्हाधिकारी परिमल सिंह यांनी डिजिटलायझेशनचा प्रस्ताव शासनासमोर ठेवला. त्याला मंजुरी मिळाल्याने संपूर्ण राज्यात हा उपक्रम राबवण्याच्या सूचना शासनाने दिल्या आहेत. त्याची अंमलबजावणी अकोला जिल्हा प्रशासनाने सर्वात प्रथम करून बहुमान पटकावला आहे. यासाठी सहकार्य करणाऱ्या कोतवाल कारव्ही डाटा मॅनेजमेंट या खासगी कंपनीच्या कर्मचाऱ्यांचेही िजल्हाधिकाऱ्यांनी कौतुक केले. या वेळी नायब तहसीलदार महेंद्र आत्राम, नायब तहसीलदार पूजा माटोडे, नायब तहसीलदार प्रतीक्षा तेजनकर, नायब तहसीलदार आराधना निकम, मंडळ अधिकारी अजय तेलगोटे यांच्यासह मंडळ अधिकारी तलाठी उपस्थित होते.

प्रमाणपत्रे त्वरित देऊ
उपविभागीयअधिकारी प्रा. संजय खडसे यांनी सांगितले की, जनतेला वेळेत शासकीय सुविधांचा लाभ मिळेल, यासाठी प्रयत्न करत आहोत. पूर्वजांच्या काळात कोतवालाने जतन केलेले दस्तऐवज संगणकीकृत करण्यावर आम्ही भर दिला. दररोज २०० प्रमाणपत्रांची मागणी होते. त्यामुळे विलंब अडचण िनर्माण व्हायची ती आता होणार नाही.
बातम्या आणखी आहेत...