आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

जागतिक पक्षी दिन- परागीकरणामध्ये पक्ष्यांचा मोलाचा वाटा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला- पर्यावरणाचे नैसर्गिकरीत्या संवर्धन करण्याचे कार्य करणारा पक्षी वर्ग हा निसर्गातील महत्त्वाचा दुवा आहे. परंतु, मानवाचा नैसर्गिक चक्रामध्ये होत असलेल्या हस्तक्षेपामुळे पक्षी वर्गातील अनेक प्रजाती धोक्यात आल्या आहेत. परिणामी, पर्यावरणाचे संतुलन बिघडत आहे. तेव्हा 20 जून रोजी असलेल्या जागतिक पक्षी दिनानिमित्त प्रत्येकाने पक्षी संवर्धनासाठी एक पाऊल उचलणे गरजेचे आहे.
जिल्ह्यातील काटेपूर्णा अभयारण्य जैवविविधतेने नटलेले आहे. या जैवविविधता परिणामी पर्यावरण संरक्षणातील महत्त्वाचा दुवा म्हणून पक्षी वर्ग महत्त्वाचा दुवा म्हणून कार्य करतो. येथील काटेपूर्णा अभयारण्यात भारतातील 1200 पक्ष्यांच्या प्रजातींपैकी 123 प्रजाती वास्तव्यास आहेत. त्याचप्रमाणे या ठिकाणी अनेक पाहुणे पक्षीदेखील हिवाळ्यामध्ये वास्तव्याला येतात. यामध्ये प्रामुख्याने स्वर्गीय नर्तक, सर्प गरुड, देवपक्षी, सुतार पक्षी, खंड्या, सात भाई, कोतवाल, तांबर पक्षी, घुबड, नवरंग, किंगफिशर, ब्लू किंग फिशर, धनेकश, बुलबुल, कोकिळा, मैना, टकाचोर, शंकर, ब्राrाणी डक आदी प्रजातीचे पक्षी येथील अभयारण्यात वास्तव्यास आहेत. पक्षी वर्ग हा शेतातील धान्य तसेच बीज आपल्या पिल्लांना भरवण्यासाठी घेऊन जातात. यातील अनेक बीज जंगलाच्या विविध क्षेत्रांत पडत असल्याने वर्षभर नैसर्गिकरीत्या वृक्ष परागीकरण घडत असते. या वृक्ष परागीकरणाद्वारे जंगलातील वृक्ष वाढवण्याचे महत्त्वाचे कार्य अविरत करत असतात. परिणामी, पर्यावरण संतुलित राहण्यास मदत होते. परंतु, मागील काही वर्षांपासून मनुष्याची विकासाकडे होणारी वाटचाल व निसर्ग चक्रात होणार्‍या हस्तक्षेपामुळे या जैवविविधतेला धोका निर्माण होत आहे.
तसेच पर्यावरणामध्ये झालेल्या बदलामुळे पक्षी वर्गाचा नैसर्गिक अधिवास कमी झाला आहे, तर परिसरात होत असलेल्या रासायनिक शेतीचा आणि कीटकनाशक फवारणीचा दुष्परिणामदेखील पक्षी वर्गावर होत आहे. परिणामी, येथील तनमोर, गिधाड, जंगली कोंबड्या यांसारख्या पक्षी वर्गातील महत्त्वाच्या प्रजाती संकटात सापडल्या आहेत. त्यांच्या संरक्षणासाठी महत्त्वाचे पाऊल उचलणे गरजेचे आहे. त्यामुळे पक्षी वर्गातील अनेक प्रजाती धोक्यात आल्या आहेत.