आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

जागतिक हाडे-सांधे दिन विशेष: 70 टक्के अकोलेकरांना आहे सांधेदुखी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अकोला - हाडांची निगा न राखल्यामुळे प्रत्यक्ष व अप्रत्यक्षपणे हाडांसह जोडांवर भरपूर अत्याचार होतो. त्याच्या दुखण्याकडेही दुर्लक्ष केल्या जाते. त्यामुळे सुमारे 70 टक्के अकोलेकरांना हाडे-सांधे दुखीचा त्रास असल्याची धक्कादायक माहिती डॉ. हेमंत जोशी यांनी ‘दिव्य मराठी’शी बोलताना दिली. जागतिक हाडे-सांधे दिनानिमित्त (बोन अँड जॉइंट डे) हाडांच्या व जोडांच्या विविध आजारांसंदर्भात त्यांनी विस्तृतपणे सांगितले.

डॉ. जोशी म्हणाले, की गुडघ्यांचे व्यायाम, इंजेक्शन व काही वेदनाशामक गोळ्या घेतल्यास गुडघ्यांची खराब झालेल्या गाद्या वाचवता येऊन सांधे रोपण टाळता येऊ शकते. गुडघ्यांच्या कुर्चा गाद्या या तरुणपणीच इजा झाल्यास त्यावर नीट उपाय करणे आवश्यक आहे. शस्त्रक्रियेविनाच अनेक उपचार होऊ शकतात. मधुमेह असलेल्यांचीही शस्त्रक्रिया सहजतेने होऊ शकते. कंबरेच्या दुखण्याची काळजी घेणेही आवश्यक आहे. 60 ते 80 टक्के रुग्णांना हा त्रास आयुष्यात होतच असल्याचे त्यांनी सांगितले. शस्त्रक्रियेविना कंबर दुखीवर उपचार शक्य असून, 99 टक्के रुग्णांना त्यापासून दिलासा मिळू शकतो. हाडांच्या ठिसूळतेचे प्रमाण धक्कादायक आहे. त्यामुळे 40 वर्षांनंतर कॅल्शियम घेणे आवश्यक असल्याचे त्यांनी सागितले.

कंबरेची नस दबू नये, याची घ्या काळजी

समोर वाकून वजन उचलू नये.
वाहनांची सीट व सस्पेंशन नियमित तपासावेत.
एका हातात वजन नेण्यापेक्षा दोन्ही हातात सारखेच वजन घ्यावे.
कडक पलंगावर गादी टाकून झोपावे.
वेळीच खबरदारी घेतल्यास कंबरेच्या दुखल्याने येणारी विकलांगता टाळता येते.