आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

उत्तम प्रशिक्षण, सुविधेमुळे वाढतो आहे बुलडाण्याचा लौकिक

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बुलडाणा - मुलातील नैपुण्य आणि वाढती सुविधा यामुळे जिल्हयाचा विविध खेळात लौकिक वाढत चालला आहे. काही वर्षापूर्वी खेळ जगतात नवख्या वाटणार्‍या जिल्हयाचा लौकिक आज आंतराष्ट्रीयस्तरावर पोहचला आहे. त्यामुळे जिल्हयातील प्रशिक्षक व क्रीडा विभागाशी संबंधित मंडळी समाधान व्यक्त करत आहे.

आज खेळांची संख्या झपाटयाने वाढत चालली आहे. त्याच तुलनेत विद्यार्थी आपल्या उर्जेचा वापर नैपुण्यासाठी करतांना दिसत आहे. शहरात काही ठिकाणी खेळांचे मैदान होते. आज घडीला जिजामाता महाविद्यालय मैदान, शासकीय बी.एड. महाविद्यालय परिसर, सहकार विद्या मंदिर, जिल्हा क्रीडा संकूल जांभरून मार्ग व नवीन होवू घातलेले क्रीडा संकूल ठिकाणी खेळांना मोठया प्रमाणात वाव मिळत आहे. जिल्हयातील दीपाली नारखेडे (वेटलिफटर) र्शीराम निळे (रस्सीखेच) व र्शीकांत वाघ (क्रिकेट) या खेळाडूंनी उत्तम प्रशिक्षणाच्या आधारावर अंतराष्ट्रीय जगतात बुलडाण्याची ओळख निर्माण केली आहे. तर दुसरीकडे बुलडाण्यातून 2004 अथेन्स येथे सायकलीचा प्रवास करुन ऑलम्पिक पाहण्यासाठी गेलेले खेळाडू संजय मयुरे यांच्या सारखा उत्साह खेळाप्रति कमी होत असलेला दिसून येतो. आज खेळ आहे, मात्र उत्साह नाही अशी अवस्था झाली आहे.

उत्तम प्रशिक्षण, सुविधेमुळे वाढतो आहे बुलडाण्याचा लौकिक

बुलडाणा । प्रतिनिधी
मुलातील नैपुण्य आणि वाढती सुविधा यामुळे जिल्हयाचा विविध खेळात लौकिक वाढत चालला आहे. काही वर्षापूर्वी खेळ जगतात नवख्या वाटणार्‍या जिल्हयाचा लौकिक आज आंतराष्ट्रीयस्तरावर पोहचला आहे. त्यामुळे जिल्हयातील प्रशिक्षक व क्रीडा विभागाशी संबंधित मंडळी समाधान व्यक्त करत आहे.

आज खेळांची संख्या झपाटयाने वाढत चालली आहे. त्याच तुलनेत विद्यार्थी आपल्या उर्जेचा वापर नैपुण्यासाठी करतांना दिसत आहे. शहरात काही ठिकाणी खेळांचे मैदान होते. आज घडीला जिजामाता महाविद्यालय मैदान, शासकीय बी.एड. महाविद्यालय परिसर, सहकार विद्या मंदिर, जिल्हा क्रीडा संकूल जांभरून मार्ग व नवीन होवू घातलेले क्रीडा संकूल ठिकाणी खेळांना मोठया प्रमाणात वाव मिळत आहे. जिल्हयातील दीपाली नारखेडे (वेटलिफटर) र्शीराम निळे (रस्सीखेच) व र्शीकांत वाघ (क्रिकेट) या खेळाडूंनी उत्तम प्रशिक्षणाच्या आधारावर अंतराष्ट्रीय जगतात बुलडाण्याची ओळख निर्माण केली आहे. तर दुसरीकडे बुलडाण्यातून 2004 अथेन्स येथे सायकलीचा प्रवास करुन ऑलम्पिक पाहण्यासाठी गेलेले खेळाडू संजय मयुरे यांच्या सारखा उत्साह खेळाप्रति कमी होत असलेला दिसून येतो. आज खेळ आहे, मात्र उत्साह नाही अशी अवस्था झाली आहे.

शासनाचा सकारात्मक प्रतिसाद
शासनाकडून नापास खेळाडू विद्यार्थ्यांना उत्तीर्ण होण्यासाठी काही मार्क दिले जातात ही योजना चांगली आहे. मात्र अशीच लिप्ट पास झालेल्यांना देखील मिळावयास पाहीजे. प्रफुल्ल मोहरिल, मुख्याध्यापक तथा क्रीडा शिक्षक

खेळ म्हणून कमी महत्त्व दिले जाते
खेळाकडे शारीरिक व्याधी दूर करण्याचा मार्ग म्हणून पाहीले जाते. गरीब घरातील मुलांची आर्थिक स्थिती चांगली नसल्याने त्यांना रोजगार महत्त्वाचा वाटतो म्हणून ते त्याकडे वळतात. गणेश जाधव, जिल्हा क्रीडा अधिकारी

खेळाडूंत वाढ
जिल्हयात गुणवंत खेळाडूंची संख्या वाढतांना दिसते. क्रीडा हा प्रकार तपस्ये सारखा आहे. पैसे मोजले म्हणजे प्रमाणपत्र उपलब्ध होते. असे असले तरी पैशाने तंत्र (स्कील) मिळविता येत नाही. टी.ए. सोर, छत्रपती पुरस्कार प्राप्त क्रीडा शिक्षक

दृष्टिकोन बदलतोय
काही वर्षापूर्वी खेळांकडे करीअर म्हणून पाहण्याचा दृष्टीकोण समाजात नव्हता. परिस्थिती बदलत आहे. खेळाकडे करिअर म्हणून बघीतले जात आहे. ही मानसिकता मोठया प्रमाणात आल्यास दर्जेदार खेळाडू निर्माण होतील. संजय मयुरे, सायकल पटू,

जिल्हातील उत्कृष्ट खेळाडू
1100 विभागीय
45 राष्ट्रीय स्तरावर
03 आंतरराष्ट्रीय स्तरावर