आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कुस्तीच्या आम दंगलीला कुस्तीगिरांचा प्रतिसाद

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक


अकोला- शहरातील रेसलिंग क्लबतर्फे दिवंगत कुस्तीगिरांच्या स्मृतिप्रीत्यर्थ आज 2 फेब्रुवारीला कुस्तीच्या आम दंगलीचे आयोजन खुले नाट्यगृहात झाले. या आम दंगलीस कुस्तीगिरांनी चांगला प्रतिसाद दिला.
पूर्वी शहरात कुस्तीच्या आम दंगली होत असत. मात्र, मधल्या काळात त्यांचे आयोजन झाले नाही. शहरातील गाजलेल्या दिवंगत कुस्तीगिरांच्या स्मृतिप्रीत्यर्थ रेसलिंग क्लबने कुस्तीच्या आम दंगलीचे आयोजन झाले. या आम दंगलीत कुणीही कुस्ती खेळू शकत होते. कुस्तीसाठी कुठलेही नियम नव्हते. प्रतिस्पध्र्याला चित केल्यास कुस्तीगिराला विजेता घोषित करण्यात येत होते व रोख पुरस्कार देण्यात येत होता.

कुस्तीच्या आम दंगलीत बर्‍हाणपूर, अमरावती, हिंगोली, वाशिम, बुलडाणा, जळगाव, औरंगाबाद, यवतमाळ आदी ठिकाणांच्या कुस्तीगिरांनी सहभाग घेतला. दिवसभरात 60 पेक्षा अधिक कुस्ती रंगल्या. यामध्ये मुख्य लढत हिंगोलीच्या लक्ष्मण पहेलवानने अकोल्याच्या शिवा शिरसाटला चित करून जिंकली. लक्ष्मण पहेलवानला मान्यवरांच्या हस्ते दहा हजारांचा रोख पुरस्कार देण्यात आला.

अकोल्याच्या रफीक खानने हिंगोलीचा सचिन गायकवाड तसेच अकोल्याच्या पवन यादवने अमरावतीच्या संदीप बनसोडला चित केले. आम दंगलीच्या आयोजनासाठी गणेश कटारे, साहिल खान, अन्वर खान, शेख करामत, महंमद इरफान, अतिकुर रहेमान, फिरोज खान, गुफरान अहमद आदींनी पुढाकार घेतला. यावेळी कुस्तीप्रेमी या कुस्तीच्या दंगलीला मोठय़ा संख्येने उपस्थित होते.