आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आधार कार्डवर नऊ वर्षीय रोहन चक्क ४७ वर्षांचा!

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बोरगावमंजू - रेणुकानगरमधील रोहन गजानन धामोळे या नऊ वर्षांच्या मुलाचे वय आधार कार्डवर ४७ वर्षांचे दाखवल्याने शासनाच्या अजब कारभाराविरुद्ध आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.

गजानन धामोळे यांनी रोहनला तीन महिन्यांपूर्वी आधार कार्ड काढण्यासाठी परशुराम नाईक विद्यालयात नेले होते. आज रोहनचे आधार कार्ड पोस्टाद्वारे घरी आले. मात्र, या कार्डवर रोहनची जन्मतारीख ०१/०१/१९६८ असे दर्शवण्यात आल्याचे पाहून रोहनच्या वडिलांना आश्चर्याचा धक्काच बसला. नऊ वर्षांच्या रोहनला आधार कार्डवर चक्क ४७ वर्षांचे दाखवण्यात आल्याने शासनाच्या या अनागोंदी कारभाराविषयी संताप व्यक्त करण्यात आला.