आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

फेसबुक, व्हॉट्सअॅपवर फिरताहेत चुकीचे संदेश

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला- राज्य माध्यमिक, उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने फेब्रुवारी-मार्च २०१५ मध्ये घेतलेल्या दहावी, बारावी परीक्षेच्या निकालाच्या तारखा अद्याप जाहीर झाल्या नाहीत. दरम्यान, फेसबुक, व्हॉट्सअॅप या सोशल मीडियावरून निकालाच्या चुकीच्या तारखा फिरताहेत. त्यामुळे परीक्षार्थींमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले असून, एसएससी आणि एचएससी बोर्डाने निकालाची तारीख जाहीर करावी, अशी मागणी होत आहे.
साधारणत: मे महिन्याच्या अखेरपर्यंत बारावीचे, तर जूनच्या प्रारंभी दहावीचे निकाल जाहीर होतात. मात्र, या वर्षी अद्यापही तारखा जाहीर होत नसल्याने विद्यार्थी निकालाच्या प्रतीक्षेत आहेत. दहावी-बारावीचे वर्ष विद्यार्थ्यांच्या शालेय जीवनात ‘टर्निंग पॉइंट’ समजले जाते. या परीक्षेच्या यशावरूनच विद्यार्थ्यांच्या करिअरची दिशा निश्चित होते. यंदा बारावीची परीक्षा २१ फेब्रुवारी ते २६ मार्च या कालावधीत, तर दहावीची मार्च महिन्यात परीक्षा झाली हाेती. या दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांना आता निकालाचे वेध लागले असले तरी शिक्षण मंडळाकडून मात्र अद्यापही तारखा जाहीर झाल्याने विद्यार्थी प्रतीक्षेतच आहेत. ३० मेच्या आसपास बारावीचा, तर दहावीचा निकाल १२ ते १५ जूनच्या दरम्यान जाहीर होण्याची शक्यता विभागीय शिक्षण मंडळाच्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे.
बातम्या आणखी आहेत...