आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Young Star Club Amravati Got Hockey Tournament Title

क्रीडा स्पर्धा: हॉकी स्पर्धेच्या लढतीत यंग स्टार क्लब अमरावतीला जेतेपद

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला- अत्यंत चुरशीच्या लढतीत यंग स्टार क्लब अमरावती संघाने यजमान अकोला पोलिस संघावर 3 विरुद्ध 4 गोलने विजय मिळवत संत गजानन महाराज विदर्भस्तरीय हॉकी स्पर्धेचे जेतेपद पटकावले. रविवार, जूनला जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. रणजित पाटील मान्यवरांच्या उपस्थितीत पारितोषिक वितरणाने स्पर्धेची सांगता झाली.
अकोला पोलिस संघ यंग स्टार क्लब अमरावती दोन्ही संघ तुल्यबळ असल्याने अपेक्षेनुसार लढत रंगली. पूर्वार्धात जावेद खानने केलेल्या गोलच्या जोरावर अमरावती संघाने आघाडी घेतली. उत्तरार्धाच्या अखेरच्या काही मिनिटांमध्ये अकोल्याच्या कपिल गवईने गोल नोंदवत बरोबरी साधली. त्यानंतर दोन्ही संघांनी चुरशीची लढत दिली, मात्र गोल करता आला नाही. त्यामुळे सामन्याचा निकाल पेनॉल्टी शुटआऊटमध्ये लागला. अकोला पोलिस संघातर्फे विजय झटाले, अभिषेक पाठक, धीरज चव्हाण यांना गोल करण्यात यश आले, तर एक अडवण्यात अमरावतीचा गोलरक्षक यशस्वी ठरला. तर, अकोल्याचा मयूर निंबाळकर गोल करण्यात अपयशी ठरला.
त्यामुळे सामना अमरावती संघाने जिंकला. लढतीनंतर लगेचच पालकमंत्री डॉ. रणजित पाटील, भाटे क्लबचे अध्यक्ष अॅड. मोतीसिंह मोहता, प्रभारी पोलिस अधीक्षक निकेश खाटमोडे, श्याम अवस्थी, नीरज आवंडेकर, हॉकी संघटनेचे सचिव संजय बैस, गुरमितसिंह गोसल, डॉ. आर. बी. हेडा आदींच्या उपस्थितीत पारितोषिक वितरण करण्यात आले. या वेळी विजयी संघास रोख हजार चषक, तर उपविजेत्या संघास रोख हजार चषक देऊन गौरवण्यात आले.
पालकमंत्री पाटील यांनी खेळाडूंना शुभेच्छा देत यशासाठी सातत्य राखण्याचे आवाहन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रमेश शेलार, संजय जोग यांनी केले. या वेळी पंच अमरावतीचे शफीउद्दीन, आसिफ खान, राजकुमार झा यांचाही सत्कार करण्यात आला. स्पर्धेसाठी विजय झटाले, धीरज चव्हाण, अभिनंदनसिंह ठाकूर, अशोक शर्मा, कैलास अग्रवाल, संदेश यादव, दिलीप तिवळकर, बबलू शेख, सुदेश यादव आदींनी पुढाकार घेतला.
वैयक्तिक पुरस्कारांचेही वितरण
स्पर्धेत वैयक्तिक पुरस्कारांचेही वितरण करण्यात आले. यामध्ये सर्वोत्कृष्ट गोलरक्षक म्हणून अमरावतीने मान पटकावला, तर अंतिम लढतीतील सर्वोत्कृष्ट खेळाडू अमरावतीचा महम्मद इर्शाद, तर स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट खेळाडू अकोल्याचे अक्षय निंबाळकर, अभिनंदन ठाकूर ठरले.