आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

खेळण्याच्या वयात लादले मातृत्व, बदनामी होऊ नये म्हणून राहिली गप्प

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला - अमरावती जिल्ह्यातील दर्यापूर तालुक्यातील नांदरुन गावातील रहिवासी १५ वर्षीय बालिकेवर तिचा सावत्र जावई मंगेश गुंबळे (वय २०) याने वारंवार अत्याचार केला. त्यात ती मुलगी गर्भवती राहिली. तिच्या आईवडिलांनीतिला पहिल्यांदा १६ ऑक्टोबर रोजी तपासणीसाठी आणले होते. त्यानंतर डॉक्टरांनी तिच्यावर उपचार करून तिला घरी पाठवले होते. मात्र, त्यानंतर २६ नोव्हेंबर रोजी मुलीला पोटात दुखते म्हणूनतिला पुन्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आणि पाचव्यादिवशी तिने एका मुलीला जन्मदिला. यानंतर त्या मुलीच्या मातापित्यांनी बदनामीपोटी प्रकरण दडवले होते. त्याला रुग्णालय प्रशासनाची जोडमिळाली. अल्पवयीन मुलीने बाळाला जन्मदिला म्हणून रुग्णालय प्रशासनाने रामदासपेठ पोलिस ठाण्यात डिसेंबर रोजी तक्रार दिली. रामदासपेठ पोलिसांनी मुलीच्या तक्रारीवरून बलात्कार आणि बालकांचा हक्क आणि लैिगंक शोषण या कलमान्वये आरोपी सावत्र जावई मंगेश गुंबळे याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांकडे डिसेंबर रोजी घटनेची तक्रार केल्यानंतर पोलिसांनी प्रकरण गांभीर्याने घेतले नाही. या काळात पोलिसांनी तपास केला असता आणि घटनेच्या खोलात ते गेले असते, तर १० दिवसांत या प्रकरणाचे गूढ उकलता आले असते आणि आरोपीला मोकळीक मिळाली नसती. पोलिसांनीही दप्तर दिरंगाईचा पुरावा दिला.
पोलिस चौकीची गरज
रुग्णालयातपोलिस चौकी उपलब्ध करून देण्यात यावी, याबाबत पोलिस अधीक्षकांची भेट घेणार असल्याचे अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डाॅ. तरंगतुषार वारे यांनी सांगितले.
तपास येवदा पोलिसांकडे
हीघटना अमरावती जिल्ह्यातील येवदा पोलिस स्टेशनच्या हद्दीतील असल्याने याचा तपास येवदा पोलिसांकडे सुपूर्त करण्यात आला आहे.'' >उमेशमाळी, पोलिसउपनिरीक्षक, रामदासपेठ, अकोला
प्रतिकात्मक
जिल्हा स्त्री रुग्णालयाची हद्द रामदासपेठ की खदान पोलिस स्टेशन या भानगडीत रुग्णालय प्रशासनाची चांगलीच तारांबळ उडाली. यात बराच कालावधी उलटला. त्यामुळे पोलिस पोहोचण्यास उशीर झाल्याचे वास्तव समोर आले.
रुग्णालयाने उशिरा कळवले
मुलगीअल्पवयीन दिसत असतानाही डॉक्टरांनी दुर्लक्ष करत त्या मुलीची विचारपूस केली नाही. पोलिसांना कळवणेकिंवा महिला बालहक्क समितीला या घटनेची माहितीसुद्धा रुग्णालय प्रशासनाने देण्याचे सौजन्य दाखवले नाही
गोदावरी रुग्णालयाने केले होते रेफर
मुलगीगर्भवती असल्याची तपासणी सुरुवातीला दर्यापूर येथील गोदावरी रुग्णालयामध्ये करण्यात आली. त्यानंतर त्यांनीच अकोला येथील जिल्हा स्त्री रुग्णालयात मुलीला रेफर केले. त्यानंतर पुन्हा २६ नोव्हेंबर रोजी येथे आणले आणि तिला भरती केल्यानंतर डॉक्टरांनी तिची सामान्य प्रसूती केली. प्रसूती झाली तेव्हा मुलीचे वजन २५किलो होते.
पीडितत मुलीने आपल्या बयाणात पोलिसांना सांगितले की, ती तिचे वडील आणि जावई हे तिघेजण दुचाकीने दर्यापूरहून गावी चालले होते. खल्लार ते नांदरुन रस्त्यावरील सूतगिरणीजवळ मंगेश गुंबळे यांनी दुचाकी नादुरुस्त झाली म्हणून थांबवली. तेवढ्यात ितच्या वडिलांना अस्वस्थ वाटू लागले. त्यामुळे ते एका झाडाखाली थांबले. मंगेश हा या मुलीला सूतगिरणीच्या पाठीमागे घेऊन गेला. तेथे तिच्यावर त्याने अत्याचार केला. त्यानंतर घरी आल्यावर मुलीने घडलेला प्रसंग आईला सांगितला. मात्र, बदनामी होऊ नये म्हणून तिच्या आईने तिला गप्प केले. त्यानंतर जावयाची हिंमत वाढल्याने त्याने तिच्यावर वारंवार अत्याचार केला.