आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अकोट शहरात युवकाची हत्या

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अकोट - ऐन गणेशोत्सवाच्या काळात बुधवारी रात्री (11 सप्टेंबर) अकोटातील सरस्वतीनगरात एका युवकाची धारदार शस्राने हत्या करण्यात आली. या घटनेमुळे अकोटात पोलिस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. याप्रकरणी 10 आरोपींविरुद्ध गुन्हे दाखल करुन पोलिसांनी तीन जणांना ताब्यात घेतले आहे.

संवेदनशील अकोटमध्ये शांतता राखण्याचा पोलिसांकडून आटोकाट प्रयत्न होत आहेत. तेजस सुरेश सेदाणी हे आपले आठवडी बाजारातील किराणा दुकान बंद करून घरी आल्यावर घरासमोर गाडी उभी करीत असतानाच आठ ते दहा जणांनी त्याच्यावर हल्ला केला.

लोखंडी पाइप व शस्रांनी केलेल्या या हल्ल्यात गंभीर जखमी झाल्याने त्याला येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. नंतर अकोल्यातील सवरेपचार रुग्णालयात दाखल करण्यात आले. बुधवारी मध्यरात्री 1:45 वाजताच्या सुमारास तेजसचा रुग्णालयात उपचरादरम्यान म़ृत्यू झाला. तेजसचे वडील सुरेश पुरुषोत्तम सेदाणी यांच्या तक्रारीवरून याप्रकरणी रात्री गुन्हा दाखल करण्यात आला.

हत्येमागे गणेश मंडळाची किनार असल्याची चर्चा : व्यावसायिक तेजस सेदाणी यांच्या हत्येमागे गणेश मंडळाची किनार असल्याची चर्चा अकोटात आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते तुषार पुंडकर आणि इतर सहकार्‍यांनी तेजस यांच्यावर हल्या केल्याचे तेजस यांचे वडील सुरेश सेदाणी यांनी पोलिसात दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे. मागील काही वर्षांपासून शिवाजी कॉलेज मार्गावर गणेशाची स्थापना करण्यात येत होती. एकच मंडळ असावे या उद्देशातून ही हत्या केल्याचे समोर येत आहे.

शिवीगाळीमुळे हत्या
तेजस सेदाणी यांनी काही युवकांना हाताशी धरून नवीन गणेश मंडळाची स्थापना केली. याला तुषार पुंडकर यांचा विरोध असल्याची चर्चा अकोटात आहे. तेजसने तुषारच्या घरी जाऊन शिविगाळ केल्याची माहिती आहे. हीच बाब पुंडकर यांच्या जिव्हारी लागल्याने हे हत्याकांड घडल्याचे समजते.

तीन आरोपींना अटक
तुषार पुंडकर व त्यांचा दहा सहकार्‍यांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. पुंडकर याला अटक केली आहे . आरोपींची झाडाझडती सुरू आहे.’’ कैलास नागरे, पोलिस निरीक्षक अकोट.