आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘पीके’तील वेस्टकोट जॅकेट्सची तरुणींना भुरळ

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला - चित्रपट,सिरियलमध्ये अभिनेत्रींनी परिधान केलेल्या पोशाखाचे अनुकरण करण्याकडे तरुणींचा अधिक कल असतो. एखाद्या चित्रपटातील हिरोइनने कोणत्या प्रकारचे ड्रेस, फूटवेअर, ज्वेलरी वापरली, शिवाय तिची स्टाइल कशी होती, याकडे तरुणींचे बारीक लक्ष असते. नुकत्याच प्रदर्शित झालेल्या पीके या चित्रपटात अनुष्का शर्मा हिने वापरलेल्या वेस्टकोट जॅकेटच्या विविध प्रकारांनी तरुणींना भुरळ घातली आहे.

बदलत्या फॅशननुसार प्रत्येक ड्रेस प्रकारात थोड्या फार प्रमाणात बदल होत असतो. हिवाळा म्हटला की, विविध प्रकारच्या जॅकेटची रेंज बाजारात उपलब्ध होते. मात्र, फॅशनेबल लूक सोबतच लेटेस्ट फॅशनचे जॅकेट घेण्याकडे तरुणींची ओढ असते. नी लेंथ जॅकेटप्रमाणेच सध्या वेस्टकोट जॅकेटची चलती आहे. ऑफिसमध्ये कॅज्युअल लूकसाठी जसे हे जॅकेट वापरता येते, तसेच पार्टीवेअर म्हणूनसुद्धा याचा वापर होऊ शकतो. कॅज्युअल शर्टसोबत घातल्यावर ऑफिसवेअर तर शॉर्ट क्रॉप टॉपसोबत वापरल्यास स्टायलिश लूक मिळवता येतो. सध्या शॉर्ट क्रॉप टॉपसोबत हे जॅकेट वापरण्याकडे युवतींची पहिली पसंती मिळत आहे. ब्राइट रंगातील या जॅकेटवर फ्लोकिंग वेल्वेटची डिझाइन असल्याने ते रॉयल लूक देते. ब्लॅक, पीच, नेव्ही ब्ल्यू, रेड, ब्राऊन, व्हाइट या रंगातील जॅकेट आकर्षित करत आहेत. ५०० रुपयांपासून ७०० रुपयांपर्यंतचे विविध रंग, डिझाइनमधील या जॅकेटला अधिक मागणी आहे. सिम्पल, स्वीट बट रिच लूक देणारे, असे हे वेस्टकोट जॅकेट आहेत.

टोंट पॅटर्न जॅकेट : वेस्टकोटजॅकेट प्रमाणेच टोंट पॅटर्न जॅकेटला अधिक मागणी आहे. डेनीम प्रकारचे हे जॅकेट डेनीमच्या शॉर्टसोबत वापरण्याची फॅशन आहे. डेनीम शॉर्ट्स, क्रॉप टॉप आणि टोंट पॅटर्न जॅकेट असा ट्रेंड सुरू आहे. त्याला तरुणींची मागणी आहे.
प्लाजो, स्कर्टसोबत वापर : जिन्स,केप्री सोबत हे जॅकेट खुलून दिसतात. मात्र, प्लाजो, लाँग स्कर्टसोबत हे जॅकेट अधिक प्रमाणात वापरले जातात. प्लाजो आणि स्कर्टवर शॉर्ट टॉप वापरले जात असल्याने हे जॅकेट स्टायलिश लूक देतात.त्यामुळे या जॅकेटला पसंती मिळत आहे.

-सध्या जॅकेटच्या विविध प्रकारांना चांगली मागणी आहे. उबदार असण्यासोबत फॅशनेबल लूककडे युवतींचा अधिक कल आहे. फॅशनच्या दृष्टीने सध्या जॅकेटला विशेष मागणी आहे.'' जयेशमूर्तीकर, विक्रेता