आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

युवा महोत्सव : बेधुंद जल्लोषात थिरकली तरुणाई

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला- युवकांच्या कलागुणांना प्रोत्साहन देण्यासाठी घेण्यात येणाऱ्या युवा महोत्सवाचा पहिला दिवस तरुणांनी जल्लोषात साजरा केला. शिवाजी महाविद्यालयय आणि तीन सभागृहात झालेल्या आठ स्पर्धांमध्ये तरुणाई व्यस्त होती. अकोला, अमरावती, बुलडाणा, यवतमाळ, वाशीम जिल्ह्यातील जवळपास ३५० महाविद्यालययातील पाच हजार विद्यार्थी सहभागी झाले आहेत. प्रत्येक स्पर्धेत सहभागी होणारी चमू आणि त्यांना चिअर अप करणाऱ्या तरुणाईच्या उत्साहाने महाविद्यालयय परसिर भरून गेला.
*शिवाजी महाविद्यालयय, वास्तुशास्त्र सभागृह, मराठा मंडळ मंगल कार्यालय, आबासाहेब खेडकर सभागृहात आठ स्पर्धा
*अकोला, अमरावती, बुलडाणा, यवतमाळ, वाशीमच्या ३५० महाविद्यालययातील पाच हजार विद्यार्थ्यांचा सहभाग
कोलाज स्पर्धा
वास्तुशास्त्रसभागृहात झालेल्या कोलाज स्पर्धेत ३४ स्पर्धकांनी कला सादर केली. आकर्षक डिझाइन तयार करण्यात हे युवक मग्न होते. आर्किटेक्ट दिलीप जडे आर्किटेक्ट अंकिता पिंपळे यांनी परीक्षक म्हणून काम पाहिले.

वक्तृत्व स्पर्धा
महाविद्यालययातीलडिजिटल रूम येथे वक्तृत्व स्पर्धा झाली. यात जवळपास ४८ स्पर्धकांनी विचार मांडले. वेळेवर देण्यात आलेल्या विविध विषयांचा विद्यार्थ्यांनी ऊहापोह केला. डॉ. विवेक देशमुख, डॉ. रविप्रकाश वर्मा, डॉ. वर्षा शाह यांनी परीक्षण केले.

"प्रज्ञाचक्षुं'नी वेधले लक्ष
संगीताचीसाथ संगत करण्यासाठी आलेल्या प्रज्ञाचक्षु कलावंताने लक्ष वेधले. यवतमाळच्या महाविद्यालययातील विद्यार्थ्यांनी गोंधळ सादर केला. त्यांना तबल्यावर ठेका देण्यासोबतच गायन करणाऱ्या "प्रज्ञाचक्षुं'नी मने जिंकली. तबल्यावर ताल देताना गळ्यातून सुरेल स्वर उमटवणाऱ्या या कलावंताचे परीक्षकांनी कौतुक केले.

एकांकिका स्पर्धा
मराठामंडळ मंगल कार्यालयात एकांकिका स्पर्धा पार पडल्या. बुलडाणा जिल्ह्यातील जवळपास १६ महाविद्यालययांनी यात सहभाग नोंदवला. अभिनय, नेपथ्य, संगीत, प्रकाश योजना या सर्व प्रकारात तरुणाईने त्यांचे कौशल्य दाखवले. या स्पर्धेत प्रा. विशाल तराळ, प्रा. गजानन संगेकर, प्रा. वैभव देशमुख यांनी परीक्षक म्हणून काम पाहिले.

स्किट, माइम
स्व.आबासाहेब खेडकर सभागृहात झालेल्या स्किट माइम स्पर्धेत युवकांमधील अभिनय क्षमता पणाला लागली. काही विनोदी तर काही सामाजिक समस्येवर भाष्य करणाऱ्या स्कीटने हसता हसता रडवलेसुद्धा, तर मूकनाट्यात शब्दाविना भावना समजल्या गेल्या. प्रबोधनासोबतच वातावरण हलकेफुलके करण्याचे काम याने केले. स्किट स्पर्धेत बुलडाण्यातील १२ महाविद्यालयय आणि अकोल्यातील नऊ महाविद्यालयय सहभागी झाले, तर माइम स्पर्धेत बुलडाणा जिल्ह्यातील १४ तर अकोल्यातील १० महाविद्यालयय सहभागी झाले. या दोन्ही स्पर्धेचे परीक्षण प्रा. मधू जाधव, प्रा. दिलीप अलोणे डॉ. दिलीप देशमुख यांनी केले.

स्व. डॅडी देशमुख खुला रंगमंचावर दुपारी लोकनृत्याचा आविष्कार पाहायला मिळाला. यवतमाळ जिल्ह्यातील जवळपास २७ महाविद्यालययातील चमूंनी जोगवा, गोंधळ, बंजारा नृत्य, आदिवासी नृत्य असे विविध नृत्य सादर केले. नृत्यासोबत परीक्षक डॉ. प्रफुल्ल गवई यांच्या शेरोशायरीने रंगत आणली. अ‍ॅड. रसिका वडवेकर देशमुख डॉ. वर्षा बाकरे पाटील यांनी परीक्षक म्हणून काम पाहिले.