आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तरुणांमध्ये एचआयव्ही बाबत जागृती करणे आवश्यक

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला- एचआयव्ही आणि एड्स यात फरक असून, तो युवकांनी समजून घेणे आवश्यक आहे. युवकांमध्ये एड्सबाबत अनेक गैरसमज आहेत. तरुणांमध्ये याबाबत जागृती होणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन जिल्हा सामान्य रुग्णालय येथील एचआयव्ही एड्स नियंत्रण कार्यक्रमाचे समुपदेशक नाना इंगळे यांनी केले. र्शीमती राधादेवी गोयनका महिला महाविद्यालयात 5 फेब्रुवारीला रेड रिबन कक्षाची स्थापना करण्यात आली. त्या वेळी ते बोलत होते.
संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठांतर्गत राष्ट्रीय सेवा योजना विभागातर्फे या कक्षाची स्थापना करण्यात आली आहे. नाना इंगळे यांनी विद्यार्थिनींना एचआयव्ही (ह्युमन इम्युनो व्हायरस)व एड्स (अँक्वायर्ड इम्युनो डेफिशियंसी सिंड्रोम)यातील यातील फरकाची माहिती युवकांना समजावून देण्यात आली. याबाबत असलेले गैरसमज, एड्स होण्याची कारणे, त्याची दिसणारी लक्षणे आणि त्यावरील उपाय याबाबत माहिती दिली. युवकांनी एचआयव्हीच्या लागणीबाबत अधिकाधिक योग्य माहिती मिळवली पाहिजे, असे मत त्यांनी या वेळी व्यक्त केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षा प्राचार्या डॉ. वीणा मोहोड यांनी उपस्थितांना एड्स आणि एचआयव्हीबाबत मार्गदर्शन केले.
या आयोजित कार्यक्रमाचे प्रास्ताविक राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी प्रा. विजय आळशी यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मोनिका शिरसाट यांनी केले. आभार प्रदर्शन संपदा सोनटक्के यांनी केले. या वेळी युवा विश्व रक्तदाता संघाचे अध्यक्ष अँड. संतोष गावंडे, प्रा. प्रमिला बोरकर, प्रा. राजेश नितनवरे, प्रा. विनोद चव्हाण, प्रा. ललित भट्टी, प्रा. विश्वनाथ गद्रे, प्रा. विजया खांडेकर, प्रा. सुलोचना मानकर, प्रा. विनोद खैरे, विद्यापीठ प्रतिनिधी रश्मी घुगे यांच्यासह प्राध्यापक उपस्थित होते.
200 विद्यार्थिनींची रक्तगट तपासणी
महाविद्यालय आणि युवा विश्व रक्तदाता संघातर्फे महाविद्यालयातील जवळपास 200 विद्यार्थिनींची रक्तगट तपासणी करण्यात आली. संघाचे अध्यक्ष अँड. संतोष गावंडे यांनी रक्तगट तपासण्याचे महत्त्व सांगितले. संघाचे सदस्य विलास बुढळकर, विजय पाथ्रे, विशाल पोरे यांनी तपासणी केली. या वेळी रक्तदाता अभियानांतर्गत रक्तदाता विद्यार्थिनींची नोंदणी करण्यात आली. संघाचे सदस्य प्रवीण आगरकर, अँड. प्रवीण गावंडे, धीरज वानखडे, स्वप्निल जैन, सचिन पाटील यांच्यासह महाविद्यालयातील शिवानी नाकाडे, संपदा सोनटक्के, अंकिता नानोटे, सारिका सरोदे, जया मांडे, भारती सोनटक्के यांनी पर्शिम घेतले.