आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराअकोला - जिल्हा परिषदेच्या शिक्षण सभापती जयाताई गावंडे यांचे पती ज्ञानदेवराव गावंडे यांनी निमकर्दा येथील वैभव खेळकर या युवकाकडून ताडपत्री देतो म्हणून चार हजार रुपये घेतल्याचा आरोप केला. ताडपत्री मिळाली नाही आणि आपले पैसे परत न दिल्याने नैराश्यातून शुक्रवारी दुपारी अंगावर पेट्रोल घेऊन आत्मदहनाचा प्रयत्न त्या युवकाने केला.
या संदर्भात त्या युवकाकडून मिळालेल्या माहिती नुसार शिक्षण सभापती जयाताई गावंडे यांचा गट असलेल्या निमकर्दा येथील वैभव गजानन खेळकर नामक युवकाला सहा महिन्यांपूर्वी शिक्षण सभापती यांचे पती ज्ञानदेवराव गावंडे यांनी त्याला ताडपत्रीसाठी चार हजार मागितले, असे त्या युवकाचे म्हणणे आहे. ज्ञानदेवराव गावंडे यांची मागणी पूर्ण करत त्या युवकाने ताडपत्री मिळण्यासाठी चार हजार रुपये दिले, असे त्याने सांगितले. परंतु, गेल्या सहा महिन्यांपासून ताडपत्री मिळाली नाही. वेळोवेळी पैसे परत देण्याची विनंती केली. आपले पैसे परत मिळण्याची शक्यता नसल्याने वैभव खेळकर या युवकाने आत्मदहनाचा प्रयत्न केला. दरम्यान आपले पैसे परत मिळावे, यासाठी काल रात्री त्या युवकाने गावंडे यांना पुन्हा विनंती केली होती. मात्र, त्यांनी पैसे देण्यास नकार दिल्याने युवकाने जिल्हा परिषदेच्या आवारात येऊन अंगावर पेट्रोल घेऊन आत्मदहनाचा प्रयत्न केला. मात्र, वेळीच विरोधी पक्षनेते सेवकराम ताथोड आणि नागरिकांनी धाव घेऊन त्या युवकाला आवर घातला. त्यामुळे दुर्दैवी घटना टळली.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.