आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Youth 'Valentine's Day' Is Celebrated, Not 'Week'

तरुणाई ‘व्हॅलेंटाइन डे’ नव्हे तर साजरा करतात ‘वीक’

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला-प्रेमाचा दिवस म्हणून साजरा केला जाणारा ‘व्हॅलेंटाइन डे’ आता नुसता एका दिवसापुरता र्मयादित राहिलेला नाही. तरुणाई आता प्रेमाचा पूर्ण आठवडा ‘व्हॅलेंटाइन वीक’ साजरा करत आहे. याची सुरुवात 7 फेब्रुवारीपासून होऊन 14 फेब्रुवारीला व्हॅलेंटाइन डे ला समाप्ती होते.
फेब्रुवारीच्या सुरुवातीपासूनच या दिवसांचे तरुणाईला वेध लागतात. त्यासंदर्भातील मेसेजेस्ची देवाण-घेवाण सुरू होते. सध्या फेसबुक, व्हॉट अँपवर मेसेजेस् शेअर केले जात आहे. 7 तारखेपासून रोज विविध प्रकारचे डे साजरे केले जाणार असून, त्याचा टाइम‘टेबल’देखील ‘बुक ’ तयार करण्यात आला आहे. प्रेमाच्या बदललेल्या व्याख्येप्रमाणे साजरा करण्याच्या पद्धतीतही बदल होत आहे. या डेज्मुळे प्रत्येक नात्यातील प्रेम व्यक्त होऊन नाते घट्ट होण्यास मदत होत आहे. हा आठवडा फक्त तरुणाईसाठी नसून, प्रत्येक वयातील व्यक्ती तो साजरा करतो. गुलाबाच्या रंगांच्या विविध भावना व्यक्त करण्यासाठी उपयोग होतो.
त्यामुळे एखाद्यासोबत झालेला वाद पांढर्‍या रंगाचे गुलाबाचे फूल देऊन मिटवता येतो. तसेच वेगवेगळ्या प्रकारासाठी चॉकलेट ठरवले आहे. एकही शब्द न बोलता नुसते गुलाब किंवा एक चॉकलेट देऊन आपला संदेश देण्याची ही अनोखी पद्धत आहे.
व्हॅलेंटाइन वीकचा टाइमटेबल
7 फेब्रुवारी - रोझ डे
8 फेब्रुवारी- प्रपोज डे
9 फेब्रुवारी- चॉकलेट डे
10 फेब्रुवारी- टेडी डे
11 फेब्रुवारी- प्रॉमिस डे
14 फेब्रुवारी- व्हॅलेंटाइन डे