आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराबडनेरा- टपाल विभागाच्या गलथानपणाचा फटका रेल्वे भरती बोर्डाची परीक्षा देण्यास इच्छुक असलेल्या युवकांना बसल्याची बाब उघड झाली आहे. विशेष म्हणजे, मुंबई येथून निघालेल्या परीक्षापत्रास बडनेरा येथे पोहोचण्यास तब्बल एक महिना लागला. टपाल विभागाच्या चुकीमुळे युवकांना मात्र परीक्षेला मुकावे लागले.
बडनेराच्या जुनीवस्ती येथील टिळक कॉलनी येथील काही युवकांनी मुंबई रेल्वे भरती बोर्डात अर्ज सादर केले होते. मुंबई येथील विविध केंद्रांवर ही परीक्षा रविवारी (दि. 22) घेण्यात आली. या परीक्षेसाठी प्रवेशपत्र 27 ऑगस्टला मुंबई येथून रवाना करण्यात आले. मुंबई येथून निघालेली व्यक्ती 12 तासांत बडनेरा येथे पोहोचते, तर परीक्षापत्र किंवा पत्र पोहोचण्यास किमान दोन ते तीन दिवसांचा कालावधी पुरेसा आहे. असे असताना येथील अनेक युवकांना परीक्षापत्र परीक्षा झाल्यानंतर म्हणजेच 23 सप्टेंबरला प्राप्त झाले. संबंधित परीक्षेसाठी केलेल्या पर्शिमावर पाणी फेरण्याचे काम टपाल विभागाने केले, अशी प्रतिक्रिया या युवकांनी व्यक्त केली.
कर्मचार्यांचे दुर्लक्ष
परीक्षापत्रावर मुंबई येथून सुटल्याची तारीख 27 ऑगस्ट आहे. 440001 या पीनकोड क्रमांक असलेल्या टपाल कार्यालयातून ते पत्र निर्गमित झाले. त्यावर 4 डी 73 - 00928847 हा क्रमांकदेखील अंकित आहे. मात्र, बडनेरा येथील टपाल कार्यालयाचा कोणताही शिक्का त्यावर मारण्यात आला नाही. त्यावरून परीक्षापत्र मुद्दाम तर दडवून ठेवले नाही ना, अशी शंका उपस्थित होत आहे. यापूर्वीदेखील असे प्रकार या परिसरातील युवकांसोबत घडले असल्याची माहिती मिळाली आहे.
चौकशी करणार
मुंबई येथून येणार्या टपालाकरिता स्वतंत्र आरएमएस यंत्रणा आहे. आरएमएसमुळे पत्र लवकर प्राप्त होतात. बडनेरा येथील प्रवेशपत्र उशिरा मिळाल्याच्या प्रकरणाची माहिती घेणार आहे. यासोबतच काही तक्रार असल्यास विभागामार्फत चौकशी केली जाईल.
के. एन. बावनकुळे, प्रवर अधीक्षक (प्रभारी),
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.