आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Yuva Sena Attack On Arrtested Corporater Rajesh Kalekar

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

अकोला: अटकेतील नगरसेवकावर हल्ला, मनपातला आले छावणीचे स्वरूप

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अकोला - कार्तिक जोशी हत्या प्रकरणात अटकेत असलेल्या मनसे नगरसेवक राजेश काळेवर मंगळवारी येथील युवा सेनेचे शहराध्यक्ष सागर भारुका व त्यांच्या सहकार्‍यांनी हल्ला करण्याचा प्रयत्न केला. पण, पोलिसांनी समयसुचकता दाखवत तो परतावून लावला. या वेळी पोलिसांनी सौम्य बळाचा वापर केला. महापालिका आमसभेत सहभागी होण्यासाठी नगरसेवक राजेश काळेला येथे आणण्यात आले होते. त्या वेळी त्याच्यावर हल्ल्याचा प्रयत्न झाला. पोलिस दलातील गुप्त माहिती येथे उघड झाल्याचे या घटनेवरून सिद्ध झाले.

अटकेत असलेले मनसे नगरसेवक राजेश काळे हे महापालिकेच्या महासभेत उपस्थित राहण्यासाठी पोलिस बंदोबस्तात आले. तसा त्यांना नगरसेवक या नात्याने अधिकार आहे. या वेळी युवा सेनेचे पदाधिकारी सागर भारुका व त्यांच्या पंधरा ते वीस सहकार्‍यांनी त्याच्यावर हल्ल्याचा प्रयत्न केला. या वेळी शहर कोतवाली पोलिस ठाण्याचे अधिकारी आणि मोठा पोलिसांचा ताफा तिथे होता. सागर भारुका यांनी राजेश काळे यांना दुखापत करण्याच्या उद्देशाने हा जमाव केला होता. पोलिस प्रशासनाने कडक बंदोबस्त ठेवल्याने अटकेतील राजेश काळे याच्यावर हल्ला झाला नाही. पण, या घटनेमुळे महापालिका परिसरात तणाव निर्माण झाला होता. नगरसेवक राजेश काळे याच्यावर अंगावर जमाव येत असल्याचे लक्षात येताच महापालिकेत आत जाताना व बाहेर निघताना पोलिसांना सौम्य बळाचा वापर करावा लागला.

हत्येचे प्रकरण न्याय प्रविष्ट असताना राजेश काळे याच्यावर हल्ल्याचा झालेला प्रयत्न त्याच्या जीवाला धोका असल्याचे स्पष्ट करत आहे. या सर्व प्रकारामुळे महापालिकेतील प्रशासकीय कामकाज ठप्प झाले होते. राजेश काळे याच्यासोबत पोलिसांनीदेखील महापालिका सभागृहात ठाण मांडले होते. काही वेळ सभागृहाच्या कामकाजात सहभागी झाल्यानंतर त्याची रवानगी कारागृहात करण्यात आली.