आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Zilha Parishad Engineer Not Follow State Government Order

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

'त्या' अभियंत्यांनी केली राज्य शासनाच्या आदेशाची अवहेलना

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला - जिल्हापरिषदेच्या त्या सहा अभियंत्यांच्या प्रतिनियुक्तीचा कार्यकाळ ३१ जानेवारी रोजी संपुष्टात आला असतानाही अद्याप ते अभियंते मूळ पदस्थापनेच्या ठिकाणी रुजू झाले नाहीत. पंतप्रधान ग्राम सडक योजनेच्या अधीक्षक अभियंत्यांनीसुद्धा त्यांना कार्यमुक्त करण्यात दिरंगाई केली आहे. जलसंधारण ग्रामविकास मंत्रालयाच्या कक्ष अधिकारी यांनी ३१ जुलै रोजी दिलेल्या लेखी पत्राची अधीक्षक अभियंता संबंधित शाखा अभियंत्यांनी अवहेलना केली आहे.

पंतप्रधान ग्राम सडक योजनेंतर्गत अकोला येथील जिल्हा कार्यालयात जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाचे शाखा अभियंता के. जे. देशमुख, एस. के. राऊत, एस. एस. तायडे, बी. एस. शहा, ए. बी. पाचपोर, डी. एम. ठाकरे, टायपिस्ट ए. एम. डिडोळकर या कर्मचा-यांना तात्पुरत्या स्वरूपात प्रतिनियुक्तीवर बोलावण्यात आले होते. मात्र, आज रोजी या अभियंत्यांना १४ वर्षे प्रतिनियुक्तीवर झाले आहेत. मध्यंतरी आपले अभियंते परत मागण्यासाठी जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाने अनेकदा पाठपुरावा केला. मात्र, तरीसुद्धा हे अभियंते परत आले नाहीत, शिवाय अधीक्षक अभियंता, ग्राम सडक योजना यांनीही त्यांना कार्यमुक्त केले नाही. दरम्यान, ३१ जुलै रोजी जलसंधारण ग्रामविकास मंत्रालयातील कक्ष अधिकारी सुषमा कांबळी यांनी या अभियंत्यांना ३१ जानेवारी २०१५ पर्यंत सहा महिन्यांच्या कालावधीसाठी प्रतिनियुक्ती दिली होती. प्रतिनियुक्तीचा कालावधी झाल्यानंतर तत्काळ मूळ पदस्थापनेच्या ठिकाणी रुजू व्हावे, असे त्या वेळीच आदेशित केले होते. या अभियंत्यांना ३१ जानेवारी रोजी सहा महिन्यांचा कालावधी झाला, तरीसुद्धा ते अद्याप जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागात रुजू झाले नाही. त्यामुळे अभियंत्यांनी राज्य शासनाच्या आदेशाची अवहेलना केली आहे.

फाइल मंत्रालयात
अभियंत्यांच्याप्रतिनियुक्तीची फाइल ग्रामविकास जलसंधारण मंत्रालयात सचिवाकडे पाठवली आहे. आमच्या अभियंत्यांना कार्यमुक्त करण्याबाबतचे पत्रही अधीक्षक अभियंता, पंतप्रधान ग्राम सडक योजना, अमरावती यांना पाठवण्यात आले आहे. हे अभियंते जर परत आले नाहीत, तर त्यांचे वेतन रोखण्याचीसुद्धा कार्यवाही करण्यात येईल. विजयकुंभारे, कार्यकारी अभियंता, बांधकाम विभाग, जिल्हा परिषद, अकोला

फाइल सचिवांच्या दालनात
बांधकामविभागाचे कार्यकारी अभियंता विजय कुंभारे यांनी अभियंत्यांना परत बोलावण्याचा प्रस्ताव तयार केला. मुख्य कार्यकारी अधिकारी एम. देवेंदरसिंग यांनी तत्काळ याबाबतची कार्यवाही करण्याचे आदेशही दिले. सोमवारी अभियंत्यांची फाइल जलसंधारण, ग्रामविकास मंत्रालयात सचिवाच्या दालनात पुढील कार्यवाहीसाठी रवाना करण्यात आली आहे.