आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Zilha Parishad Ex Political Member Spend Illegal Money On Travelling

अकोला जिल्हा परिषदेच्या माजी पदाधिकार्‍यांनी मर्यादेपेक्षा लाटला जास्त प्रवास भत्ता

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अकोला - जिल्हा परिषदेच्या माजी पदाधिकार्‍यांना मर्यादेपेक्षा जास्त प्रवास भत्ता मंजूर केल्याचा प्रकार उजेडात आला आहे. या पदाधिकार्‍यांकडून 88 हजार 748 रुपये वसूल करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. जिल्हा प्रशासनाने त्यांना नोटिसा बजावल्या आहेत.

पदाधिकार्‍यांना प्रवास भत्ता देण्यात येतो. यासाठी आर्थिक मर्यादाही निश्चित करण्यात आल्या आहेत. यामध्ये जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष बालमुकुंद भिरड, साबिया अंजुम, माजी उपाध्यक्ष गजानन पुंडकर, दामोदर जगताप, सभापती दुर्गाताई कांबे, केशवराव माळी यांची देयके मंजूर करण्यात आली.


वातानुकूलित प्रवास
पदाधिकार्‍यांना विमान व रेल्वेच्या वातानुकूलित प्रथम वर्ग प्रवास भत्ता मिळत नाही. असे असतानाही रेल्वेचा वातानुकूलित प्रवास केल्याचे दाखवण्यात आले आहे.


रक्कम न भरल्यास कोणतीही निवडणूक लढवता येणार नाही.’’ जावेद इनामदार, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (प्रशासन)


जादा प्रवास भत्त्याबाबत जि. प. प्रशासनाकडून पत्र मिळाले. लवकरच रक्कम भरण्यात येईल.’’ साबिया अंजुम सौदागर, माजी अध्यक्ष