आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शिवसेनेची यादी ‘रेडी’

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अकोला - जिल्हा परिषद निवडणुकीसाठी शिवसेनेच्या उमेदवारांची यादी निश्चित झाली असून, यासंदर्भात आज शिवसेनेची मुंबई येथे बैठक झाली. जिल्ह्यातील नेत्यांनी आपला अहवाल शिवसेनेतील वरिष्ठ नेत्यांकडे सादर केला आहे. उद्या उमेदवारांच्या यादीवर शिक्कामोर्तब होऊन, उद्या सायंकाळी किंवा शुक्रवारी सकाळी यादी जाहीर करण्यात येणार आहे, अशी माहिती आहे.

जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी शिवसेना-भाजप युतीवर शिक्कामोर्तब झाल्यावर शिवसेनेकडून इच्छुक उमेदवारांचे अर्ज मागवण्यात आले. शेगाव येथे इच्छुक उमेदवारांच्या मुलाखली घेण्यात आल्या. जिल्हा परिषद निवडणुकीतील उमेदवार निश्चित करण्यासाठी जिल्ह्यातील नेत्यांनी अहवाल तयार केला. अकोला जि. प. निवडणुकीतील उमेदवार निश्चित करण्यात शिवसेना नेत्यांची बुधवारी मुंबईत बैठक झाली. या बैठकीला खासदार अनिल देसाई, शिवसेनेचे जिल्हा संपर्क नेते आमदार दिवाकर रावते, आमदार गोपीकिशन बाजोरिया, अँड. अनिल काळे, शिवसेना जिल्हा प्रमुख र्शीरंग पिंजरकर आदी बैठकीला उपस्थित होते. या बैठकीत जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीची चर्चा करण्यात आली. युतीमध्ये सुरू असलेल्या जागावाटपासंदर्भात चर्चा झाल्याची माहिती आहे.

जिल्ह्यातील नेत्यांनी शिवसेनेच्या वरिष्ठ नेत्यांकडे उमेदवारासंदर्भातील अहवाल सादर केला. यामध्ये शिवसेनेच्या संभाव्य उमेदवारांच्या यादीवरदेखील चर्चा झाली. जि. प. निवडणुकीसंदर्भातील अहवाल शिवसेना अध्यक्ष उद्धव ठाकरे यांच्यापुढे गुरुवारी ठेवण्यात येणार आहे. शिवसेना अध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी उमेदवारांच्या यादीला ‘ग्रीन सिग्नल’ दिल्यावर यादीवर शिक्कामोर्तब होणार आहे. उद्या सायंकाळी किंवा शुक्रवारी सकाळी उमेदवारांची यादी जाहीर करण्यात येणार असल्याची माहिती आहे.