आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘मिनी मंत्रालय’ मतदान आज

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अकोला- जिल्हा परिषद, पंचायत समितीसाठी रविवारी 1 डिसेंबरला निवडणूक होत आहे. याकरिता प्रशासन सज्ज असून, मतदार राजाला पहिल्यांदाच निवडणुकीत नकाराधिकाराचा अधिकार प्रदान केला आहे. त्यामुळे निवडणुकीत किती उमेदवारांना नकाराचा सामना करावा लागतो, याकडे लक्ष लागले आहे.जिल्हा परिषदेच्या 53 गटांसाठी,पंचायत समितीच्या 106 गणांसाठी ही निवडणूक होत आहे. जिल्हय़ातील मतदान केंद्रावर अनुचित प्रकार घडू नये, याकरिता पोलिस व महसूल विभागाला सजग राहण्याच्या सूचना जिल्हाधिकार्‍यांनी दिल्या आहेत. अखेरच्या दिवशी 309 जणांनी माघार घेतल्याने जिल्हा परिषदेच्या 53 गटांसाठी आता 262 उमेदवार रिंगणात आहेत.सात पंचायत समितीमधील 106 गणांमधून 396 जणांनी माघार घेतल्याने 497 उमेदवार निवडणूक लढवत आहेत. एकूण 759 उमेदवारांचे भवितव्य आज निवडणुकीच्या माध्यमातून मतदार राजाच्या हाती असणार आहे. त्यात कुणाला कौल मिळतो, हे निकालानंतरच स्पष्ट होणार आहे.