आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

जिल्हा परिषद निवडणुक : भाजप-शिवसेनेसह अपक्ष सदस्य झाले वरचढ

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अकोला - जिल्हा परिषदेच्या विविध विकासकामांचा निधी खेचून नेण्यात सत्ताधार्‍यांपेक्षा शिवसेना भाजप व अपक्ष जिल्हा परिषद सदस्यांनी बाजी मारली आहे. त्यामुळे सत्ताधारी पक्षाच्या सदस्यांची चांगलीच कोंडी झाल्याचे दिसून येत आहे.

जिल्हा परिषदेच्या सत्तेत भाजप-शिवसेनेचे सेवकराम ताथोड, गजानन पुंडकर, नितीन देशमुख, स्मिता राजणकर या सदस्य म्हणून कार्यरत आहेत. या सदस्यांनी त्यांच्या गटाच्या विकासासाठी जिल्हा परिषद अध्यक्ष पुष्पाताई इंगळे यांच्याशी सलोख्याचे संबंध असल्याचा फायदा घेत मोठय़ा प्रमाणात विकास निधी मिळवला. या तुलनेत भारिप बमंस पक्षाच्या सदस्यांना मात्र अध्यक्षासोबत तेवढी जवळीक साधता आली नाही. परिणामी अध्यक्षांना सर्वसाधारण सभा असो वा स्थायी समिती सभा, मासिक सभा यामध्ये फारसा विरोध झाला नसल्याचे दिसते.

दुसरीकडे भारिप-बमसंच्या सत्ताधारी सदस्यांकडून मात्र अध्यक्षांना नेहमी मनस्ताप सहन करावा लागत असल्याच्या घटना यापूर्वीही घडल्या आहेत. 28 ऑगस्टला जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत सदस्य सुरेश फाळके यांनी अध्यक्षांवर केलेले आरोप अधिकारी आणि पदाधिकार्‍यांना विचार करायला लावणारे ठरलेत.

भविष्यात परिणाम
सत्ताधारी पक्षांपेक्षा विरोधी गटाच्या जिल्हा परिषद सदस्यांना वितरित करण्यात आलेल्या विकास निधीच्या वाटपाने सत्तेतील सदस्य नाराज आहेत. याचा परिणाम आगामी जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत दिसतील, अशी भीती काही सदस्यांनी व्यक्त केली आहे.