आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

मिनी मंत्रालयात 27 महिलांसाठी आरक्षित सर्कलची नावे घोषित

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अकोला - जिल्हा परिषदेच्या 53 जागांसाठीचे आरक्षण गुरुवारी जाहीर झाले. महिलांसाठी 50 टक्के आरक्षण असल्याने 27 जागांवर महिला उमेदवारांना प्रतिनिधित्त्व मिळणार आहे. अनुसूचित जातींसाठी 12, अनुसूचित जमातींसाठी 4, मागास प्रवर्गासाठी 14 जागा निश्चित करण्यात आल्यात. या आरक्षित जागांपैकी निम्म्या जागा संबंधित प्रवर्गातील महिलांसाठी राखीव आहेत. जिल्हाधिकारी कार्यालयातील छत्रपती सभागृहात हे आरक्षण घोषित झाले.

यंदा जिल्हा परिषदेत सदस्यांची संख्या एकने वाढत 53 झाली आहे. जिल्ह्यातील 11 लाख 71 हजार 61 लोकसंख्येनुसार हे आरक्षण जाहीर झाले. पंचायत समितीच्या 106 गणांसाठी निवडणूक होईल. अनुसूचित जातीच्या दोन लाख 71 हजार 770 लोकसंख्येसाठी 12 जागांचे आरक्षण घोषित झाले. तसेच 90 हजार 30 अनुसूचित जमातीच्या लोकसंख्येसाठी चार जागांचे आरक्षण जाहीर झाले. जिल्हाधिकारी अरुण शिंदे, निवडणूक अधिकारी उदय राजपूत, र्शीकांत देशपांडेसोहम वायाळ यांची या वेळी उपस्थिती होती.

बार्शिटाकळीत एकच खुला प्रवर्ग
बार्शिटाकळीतील सात जागांपैकी एक जागा ही खुल्या प्रवर्गासाठी सुटली आहे. या ठिकाणी सहा जागांवर महिलांचे आरक्षण निघाले आहे.

वादाने गाजली सोडत
जिल्हा परिषद सदस्य नितीन देशमुख यांनी आरक्षणाबाबत आक्षेप घेतला. या वेळी इतर मागास प्रवर्गातील आरक्षणाची घोषणा होणे बाकी होते. त्यामुळे इतरांनी सभागृहात जोरदार आक्षेप घेतला.

भाऊ तुमची सीट गेली ताईंना..
आरक्षणामुळे अनेक पुरुष राजकारण्यांना फटका बसला आहे. त्यामुळे त्यांच्या कार्यकर्त्यांनी आरक्षण जाहीर झाल्याबरोबर भ्रमणध्वनीवर ‘भाऊंना’ ही बातमी कळवली. कार्यकर्त्यांनी दुसरा पर्याय म्हणून नेत्यांना ताईंना उभे करण्याचा सल्ला दिला.

निखिल व प्रज्वल यांनी ठरवले भविष्य
नोएल कॉन्व्हेंटच्या निखिल इंगोले व प्रज्वल वानखडे यांनी आरक्षणाची सोडत काढली. या सोडतीमुळे अनेकांच्या आशा पल्लवित झाल्या तर अनेकांच्या पदरी निराशा आली.