आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अकोला जिल्‍हा परिषदेत आधी बाचाबाची, नंतर सर्वच विषयांना मंजुरी

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला - जिल्हा परिषदेची शेवटची सर्वसाधारण सभा 21 डिसेंबरला राजर्षी छत्रपती शाहू महाराज सभागृहात दुपारी 1 वाजता झाली. या सभेत 3 ऑक्टोबरला झालेल्या मागील सर्वसाधारण सभेचे इतिवृत्ताचे वाचन करून मांडलेले ठराव सर्वानुमते मंजूर केले. याशिवाय वेळेवर मांडलेल्या ठरावांना मंजुरी देण्यात आली.
जिल्हा परिषद अध्यक्षा पुष्पाताई इंगळे, उपाध्यक्ष सुभाष रौंदळे यांच्यासह समाजकल्याण सभापती उषाताई मुरळ, महिला व बाल कल्याण सभापती आशाताई घाटोळ, सभापती पंढरी हाडोळे, सभापती जयाताई गावंडे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी भारत कडुकार, उपमुख्य कार्यकारी अधिकारी जावेद इनामदार यांच्यासह सर्व विभागांचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते.
सुरुवातीला 3 ऑक्टोबरला घेतलेल्या सभेच्या इतिवृत्ताचे वाचन करण्यात आले.राष्ट्रीय पेयजल कार्यक्रमांतर्गत गुडधी येथील नळ पाणीपुरवठा योजनेच्या कामाच्या निविदेस मंजुरी, जिल्हा परिषदेच्या 20 टक्के सेसफंड योजनेंतर्गत शंभर टक्के अनुदानावर मागासवर्गीय लाभार्थ्यांना टिनपत्रे, रॉकेल पंप, ताडपत्री, एचडीपीई पाइप, कुक्कुटपालनासाठी पक्षी पुरवण्याच्या योजनांचे पात्र लाभार्थी यादीस मान्यता, 20 टक्के सेसफंड योजनेमधून 100 टक्के अनुदानावर मागासवर्गीय लाभार्थ्यांना लोखंडी टिनपत्रे पुरवणे, यासह वेळेवर आलेल्या विषयांना मान्यता देण्यात आली. आजच्या सभेत सुरुवातीला जिल्हा परिषद सदस्य नितीन देशमुख व सचिव जावेद इनामदार यांच्यात वेळेवर येणार्‍या विषयावरून बाचाबाची झाली होती. विषयामध्ये शेलूबाजार येथील तीन व चार क्रमांकाच्या बंधार्‍याच्या कामांना प्रशासकीय मंजुरी, महान येथील नळ पाणीपुरवठा योजनेच्या कामाच्या निविदेस स्वीकृतीचा समावेश होता. सुरुवातीला झालेल्या बाचाबाचीचे रूपांतर गोडव्यात होऊन अखेर सभेच्या शेवटी सर्व विषयांना मंजुरी देऊन सभेचा शेवट झाला. दरम्यान, नितीन देशमुख, गजानन पुंडकर, विरोधी पक्ष नेते सेवकराम ताथोड, ज्योत्स्नाताई चोरे यांनी मनोगत व्यक्त केले.
जेवनाचे कुणी विचारले
‘जिल्हा परिषद सदस्यांना स्थायी समिती आणि सर्वसाधारण सभेपूर्वी जेवण देण्याचा प्रघात आहे. मात्र, आज आमच्या कार्यकाळातील शेवटची सर्वसाधारण सभा होती. मात्र, आज कुणी साधे जेवण घ्यासुद्धा म्हटले नाही’, असे भावनिक उद्गार जिल्हा परिषदेचे मावळते सदस्य प्रदीप देशमु़ख यांनी काढले. सदस्यांच्या कार्यकाळात आयोजित शेवटच्या सर्वसाधारण सभेत ते बोलत होते. आपल्याला भावपूर्ण निरोप दिला जाईल, अशी अपेक्षा सदस्यांना होती. मात्र, तसे काही न झाल्यामुळे सदस्यांनी नाराजी व्यक्त केली.
लोकशाही पद्धतीने चालावे : देशमुख
हे सभागृह लोकशाहीचे आहे, कुण्या एका व्यक्तीचे नाही. त्यामुळे लोकशाहीपद्धतीनेच सभागृह चालले पाहिजे, असे देशमुख म्हणाले.
विरोधी पक्षाचे मत विचारले नाही: ताथोड
गेल्या पाच वर्षांत विरोधकांचे मत ऐकले नाही, ही खंत आहे. अधिकार्‍यांनी मात्र सहकार्य केले, अशी प्रतिक्रिया विरोधी पक्षनेते सेवकराम ताथोड यांनी व्यक्त केली.
..तरच विकास शक्य झाला:
पाटकर योजना मार्गी लावण्यासाठी जिल्हा परिषदेचे सर्व अधिकारी आणि कर्मचार्‍यांचे मोठे सहकार्य लाभले. त्यांच्या कार्यामुळेच विकास करता आला, असे प्रा. सुरेश पाटकर म्हणाले.
आमचा सामूहिक फोटो काढा
पाच वर्षांच्या कारकिर्दीतील आजची शेवटची सर्वसाधारण सभा आहे. या पाच वर्षांच्या आठवणी आमच्यासोबत राहाव्यात यासाठी सर्वांचा सामूहिक फोटो काढावा, अशी मागणी जिल्हा परिषदेच्या सदस्य गीताताई लांडे यांनी यावेळी केली.नाही विरोधी पक्षाचे मत विचारले नाही: ताथोड
गेल्या पाच वर्षांत विरोधकांचे मत ऐकले नाही, ही खंत आहे. अधिकार्‍यांनी मात्र सहकार्य केले, अशी प्रतिक्रिया विरोधी पक्षनेते सेवकराम ताथोड यांनी व्यक्त केली.
.