आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

झेडपीच्या समन्वय बैठकीत अधिकार्‍यांनाही फुटला घाम

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला - जिल्हा परिषदेंतर्गत येणार्‍या सर्व विभागांच्या खातेप्रमुख गटविकास अधिकार्‍यांची समन्वय सभा गुरुवारी सकाळी ११ ते सायंकाळी या वेळेत राजर्षी शाहू महाराज सभागृहात पार पडली. तब्बल सात चाललेल्या बैठकीत मुख्य कार्यकारी अधिकारी एम. देवंेदर सिंग यांच्या प्रश्नांची उत्तरे देता देता गटविकास अधिकार्‍यांसह विविध विभागांच्या अधिकार्‍यांना चांगलाच घाम फुटला.

बैठकीला सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी जावेद इनामदार, पंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी एस. एम. कुळकर्णी, मुख्य लेखा वित्त अधिकारी गीता नागर, बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता विजय कुंभारे, शिक्षणाधिकारी अशोक सोनवणे प्रफुल्ल कचवे, पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता सुरंेद्र कोपुलवार यांच्यासह इतर विभागांचे प्रमुख उपस्थित होते. बुधवारी पार पडलेल्या स्थायी समितीच्या बैठकीत अनुपस्थित झालेले गटविकास अधिकारीसुद्धा आजच्या बैठकीला उपस्थित होते. संग्राम कक्ष, ग्रामपंचायतीचे बांधकाम, पाणीपुरवठ्याची स्थिती, घरकुल योजनेचा आढावा, प्रलंबित डी. सी. देयके, मालमत्ता करवसुली पाणीपट्टी करवसुली, िनर्मल भारत अभियान, शाळांचे बांधकाम, स्वच्छ विद्यालय मोहीम, कृत्रिम रेतन, कामधेनू योजना, लसीकरण, सेवानिवृत्ती प्रकरणे, कालबद्ध पदोन्नती, स्वच्छता मोहिमेचा आढावा घेण्यात आला. उपमुख्य कार्यकारी अधिकारी एस. एम. कुळकर्णी यांनी प्रेझेन्टेशनद्वारे योजनांची माहिती दिली. गटविकास अधिकार्‍यांच्या समन्वयाअभावी विकासकामांना गती मिळत नसल्याची खंत अधिकार्‍यांनी व्यक्त केली.

निर्मल भारतला मुहूर्त निघेना?
हगणदारी मुक्तीसाठी शासन २००७ पासून प्रयत्नशील आहे. मात्र, सात वर्षांत केवळ ७० गावेही निर्मल झाली नसल्याची वास्तविकता आहे. निर्मल भारत अभियानाच्या कामगिरीबाबत गटविकास अधिकार्‍यांनी लक्ष केंद्रित करावे, असे आवाहन सीईओंनी केले.

हातपंप तुटले, दुरुस्त कोण करणार?
हातपंपनादुरुस्त असल्याने नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. पाणीपुरवठा विभाग म्हणतो, ही भूजल सर्वेक्षण विभागाची जबाबदारी, तर भूजल विभाग म्हणतो, पाणीपुरवठ्याची जबाबदारी आहे.

संग्राम कक्षाचे कामकाज मंदावले
माहिती तंत्रज्ञान - संग्राम कक्षाच्या कामकाजावर मुख्य कार्यकारी अधिकार्‍यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. डाटा एंट्री नियमित करण्यावर भर देण्याच्या सूचना सीईओंनी दिल्या. संग्राम कक्षाच्या जिल्हा समन्वयकांनी संग्राम कक्षाचा आढावा सादर केला.

ग्रामपंचायतींचे बांधकाम अपूर्ण : केंद्रपुरस्कृत योजनंेंतर्गत अकाेला जिल्ह्यातील विविध ग्रामपंचायतींच्या बांधकामाला सुरुवात झाली आहे. मात्र, कालावधी उलटला, तरी अद्याप बांधकाम पूर्ण झाले नसल्याची वास्तविकता समोर आली.

रोहयोच्या कामांना गती द्या : रोहयोलागटविकास अधिकार्‍यांच्या हेकेखोरपणामुळे गती मिळत नाही. रोजगार हमी योजनेच्या कामाना गती देऊन ग्रामीण भागात रस्त्यांची कामे वेळेत मार्गी लावा, असे आवाहन सीईओंनी केले.

राजमाता जिजाऊ मिशन : महिलाबालकल्याण विभागाच्या राजमाता जिजाऊ मिशन अभियानाचे काम असमाधानकारक असल्याचे दिसून आले. अंमलबजावणीवर भर देऊन कुपोषण दूर करण्यास पुढाकार घेण्याची गरज निर्माण झाली.
बातम्या आणखी आहेत...