आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'भारिप-बमसं’ सदस्यांची आनंद सागरमध्ये ‘सहल’

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अकोला - ‘सायंकाळची 6.30 ची वेळ. भारिप बहुजन महासंघाचे सर्व नवनिर्वाचित सदस्य बसस्थानकाजवळील विर्शामगृहावर जमले. एकमेकांशी कुठलीही चर्चा न करता एक-एक सदस्य बॅग घेऊन उभे होते. दरम्यान, जिल्हा महासचिव दिनकर वाघ यांचा आवाज आला, चला, चला लवकर चला, घाई करा’ अगदी 30 मिनिटांच्या आत सर्व सदस्य वाहनांमध्ये बसून रवाना झाले.

जिल्हा परिषदेची सत्ता काबीज करण्यासाठी महायुतीची चर्चा फोल ठरत असतानाच 27 डिसेंबरच्या रात्री भारिप बहुजन महासंघाच्या 22 सदस्यांसह 3 अपक्ष शेगावकडे रवाना झाले आहेत. अध्यक्षपदाच्या मोर्चेबांधणीसाठी शेगाव येथील आनंद सागरमधील सहलीदरम्यान काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकार्‍यांसोबत त्यांचे मनोमिलन होणार आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली. जि.प.चे अध्यक्षपद ‘एससी’ (अनुसूचित जाती) या प्रवर्गातील उमेदवाराकडे आले आहे. भारिप-बमसंकडे या पदाकरिता पाच उमेदवार दावेदार असून, भारिप-बमसंची सत्ता प्रस्थापित झाल्यास अँड. प्रकाश आंबेडकर कुणाला खुर्चीवर बसवतात, याची उत्कंठा सर्वांनाच लागली आहे. या पाचपैकी शुक्रवारी रवींद्र गोपकर आणि शरद गवई यांच्या नावाची अध्यक्षपदासाठी चर्चा राजकीय वतरुळात सुरू होती. दरम्यान, भाजपचे खासदार संजय धोत्रे यांची सत्ता स्थापन करण्याची मनीषा आहे. मात्र, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसने कुठलाही प्रतिसाद न दिल्याने महायुतीची चर्चा फोल ठरल्याचे दिसून आले. भाजप-शिवसेना युतीकडे 19 सदस्य असतानाही सत्तास्थापनेसाठी प्रयत्न सुरू आहेत.

राजकीय वतरुळामध्ये ही सर्व घडामोड होत असताना सायंकाळी 7 वाजता बसस्थानकजवळील शासकीय विर्शामगृहावर भारिप-बमसंचे 22 सदस्य आणि 3 अपक्ष एकत्र आले. नवनिर्वाचित सदस्यांना एकत्रित आणल्यानंतर चारचाकी वाहनामध्ये बसवण्यात आले. कुठे चाललो आहोत, याची कुठलीही माहिती कोणत्याही सदस्याला नव्हती. बाळापूरचे आमदार, भारिप बहुजन महासंघाचे जिल्हाध्यक्ष बळीराम सिरस्कार हे या ठिकाणी दाखल झाले होते. दिनकर वाघ, दामोदर जगताप यांच्या कानात कुजबुज करत तेही दहा मिनिटांत निघून गेले. त्यांच्यापाठोपाठ एकूण सहा वाहने शेगावच्या दिशेने रवाना झाली.

हे सदस्य रवाना
या जिल्हा परिषद सदस्यांमध्ये अपक्ष असलेले राजेश खोने, गोदावरी जाधव, मंदा डाबेराव असे तीन व जमीरखाँ अमानखाँ, गोपाल कोल्हे, शोभा शेळके, शबानाखातून ज. सैफुल्लाखाँ, मंजूषा वडदकर, संध्या वाघोडे, रामदास मालवे, संजय आष्टीकर, देवानंद गणोरकर, रवींद्र गोपकर, सरलाबाई मेर्शाम, शरद गवई, रमीजाबी शेख साबीर, दामोदर जगताप, देशमुख गु. हुसेन गु. नबी, विजय लवाळे, रेखा अंभोरे, गीता राठोड, वेणूताई चव्हाण, देवकाबाई पातोंड, अनिता आखरे, द्रौपदाबाई वाहोकार अशा 22 सदस्यांचा समावेश आहे. दरम्यान, सत्तास्थापनेसाठी आमचे दोन सदस्य काँग्रेससोबत असणार आहेत. काँग्रेसचे पाच आणि आमचे दोन असे सात सदस्य सत्तेसाठी एकत्र येतील,असे राष्ट्रवादी र्शीकांत पिसे पाटील यांनी सांगितले.

नेते व सदस्यांशी चर्चा करून निर्णय घेणार
स्थानिक नेते व जिल्हा परिषदेचे नवनिर्वाचित सदस्य यांचेशी चर्चा करून अंतिम निर्णय घेण्यात येईल. पक्ष पातळीवर अद्याप कुठलाही निर्णय झाला नाही. जातीयवादी शक्तींसोबत जाणार नाही. अशोक धवड, पक्ष निरीक्षक काँग्रेस.

‘गेट टूगेदर’चा प्रयत्न
निवडणूक निकालानंतर प्रथमच सर्व सदस्य एकत्र आले आहेत. शेगावला जात आहोत, या माध्यमातून गेट टू गेदरचा प्रयत्न आहे. दिनकर वाघ, जिल्हा महासचिव, भारिप-बमंस.

अशी झाली धावपळ : सायंकाळी 6 वाजता ही सर्व घडामोड सुरू झाली आणि 45 मिनिटांत सर्व रवाना झाले. त्यांच्या गाड्या शेगावच्या दिशेने रवाना झाल्या.