आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • 13 Thousand Crores Investment, Only Four Thousand Employment

गुंतवणूक १३ हजार कोटी; रोजगार फक्त चार हजार! उद्योगांकडून होतेय बेरोजगारांची निराशा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती - जिल्ह्यातील औद्योगिक विकासाला चालना मिळावी म्हणून नांदगाव पेठ पंचतारांकित एमआयडीसीला अंदाजे ३० गावांमधील शेतक-यांनी २८०९.७९ हेक्टर आर जमीन दिली. उद्योग उभे राहून येणा-या पिढीला भविष्यात रोजगार मिळेल, या आशेने कवडीमोल भावाने जमिनी दिल्यानंतरही संबंधीत शेतक-यांच्या पदरी निराशाच पडली आहे. तब्बल१३ हजार कोटी रूपयांची गुंतवणूक पंचतारांकीत ‘एमआयडीसी’मध्ये होत असताना शेतक-यांना अद्यापही योग्य मोबदल्यासाठी लढा द्यावा लागत आहे.
जिल्ह्यात बेरोजगारांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत असताना येथील उद्योगातील रोजगार निर्मिती क्षमता अंत्यंत कमी आहे. मोठ्या प्रमाणामध्ये गुंतवणूक केली जात
असताना रोजगार निर्मितीस प्राधान्यक्रम दिल्या जात असल्याचे प्रशासनाच्या तयारीतून दिसून येत आहे. मात्र, प्रबळ राजकीय इच्छाशक्तीच्या अभावी स्थानिक रोजगार निर्मिती होत नसल्याचे दिसून येत असल्यामुळे शेतकरी त्यांच्या मुलांच्या हाती धुपाटणेच आलेय

उद्योगांमध्ये तब्बल तेरा हजार कोटी रुपयांची गुंतवणूक असताना नांदगाव पेठ पंचतारांकित एमआयडीसीची रोजगारनिर्मिती क्षमता केवळ चार हजार असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. अपेक्षा आणि परिसरात रोजगाराच्या आशेने जमिनी देणा-या शेतक-यांची यामुळे घोर निराशा झाली आहे. एमआयडीसीमध्ये आणखी ५०० ते १००० कोटींच्या गुंतवणुकीचे संकेत असताना देखील रोजगार निर्मितीत वाढ होणार नसल्याचे स्पष्ट होत आहे.

प्रकल्पनिहाय आढावा घेणार
-औद्योगिकक्षेत्रात उद्योग सुरू करताना गुंतवणुकीप्रमाणे रोजगार निर्मिती क्षमतेबाबत माहिती देणे बंधनकारक आहे. उद्योगांमध्ये आवश्यकतेनुसार श्रमिकांची भरती करण्यात
येते. याबाबत, निश्चित मापदंड ठरलेला नाही. नांदगाव पेठ एमआयडीसीमधील उद्योगांमध्ये रोजगार क्षमता कमी-अधिक असण्याची शक्यता आहे. याबाबत, प्रकल्प निहाय
आढावा घेत दुरुस्तीकरिता जिल्हाधिका-यांच्या अध्यक्षतेखालील समितीकडे प्रस्ताव पाठवण्यात येणार आहे. सुनीलविंचनकर, प्रादेशिकअधिकारी, अमरावती एमआयडीसी.