आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • 15 Per Cubic Meter The Water Storage Will Increase In The Pond

१५ घनमीटरने वाढेल तलावातील जलसाठा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती- गाळ काढल्यानंतर १५ घनमीटरने मोर्शी तालुक्याच्या खानापूर येथील गाव तलावाच्या जलपातळीत वाढ होणार आहे. जलयुक्त शिवार अभियानांतर्गत खानापूर गाव तलावातील गाळ काढण्याचा शुभारंभ पालकमंत्री प्रवीण पोटे यांच्या हस्ते शनिवारी (िद. ६) करण्यात आला आहे.
जिल्ह्यात जलयुक्त शिवार, पर्यावरण सप्ताहानिमित्त वृक्षलागवडीचे कार्यक्रम चांगल्या प्रकारे राबवण्यात येत आहेत. ग्रामस्थांनी शासनाच्या सर्व योजना समजून घ्याव्यात त्या योग्य प्रकारे राबवाव्यात म्हणजे अडचण येणार नसल्याचे पालकमंत्री म्हणाले. राज्यात तीन लाख ट्रान्समीटर बदलण्यात येत आहेत. येणाऱ्या काळात विहिर खोदल्यानंतर त्याला लागणाऱ्या कनेक्शनसाठी त्वरेने वीज मिळेल. वीज टंचाईमुक्त महाराष्ट्र करण्यासाठी १४ हजार ५०० मेगावॅटचे प्रकल्प राबवण्यात येत असल्याचे पोटे म्हणाले. आमदार डॉ. अनिल बोंडे यांनी या वेळी केंद्र शासनामार्फत राबवण्यात येणाऱ्या जण कल्याण पर्व, अटल पेन्शन योजना, पंतप्रधान सुरक्षा विमा योजना, पंतप्रधान जीवन ज्योती योजना आदींची माहिती दिली. आमदार आदर्श गाव योजनेतून खानापूर गावाचा सर्वांगीण विकास करण्यासाठी आपण प्रयत्न करू, असे त्यांनी सांगितले.
कार्यक्रमाला आमदार डॉ. अनिल बोंडे, जिल्हा परिषदेच्या महिला बाल कल्याण सभापती वृषाली विघे, पंचायत समितीच्या सभापती पद्मा पांचाळे, उपजिल्हाधिकारी गजेंद्र बावणे, उपविभागीय अधिकारी ललित वऱ्हाडे, उपविभागीय कृषी अधिकारी देशमुख, कृषी अधिकारी गावंडे, सरपंच प्रमोद अग्रवाल उपस्थित होते. प्रास्ताविकात सरपंच प्रमोद अग्रवाल यांनी गावाच्या विकासासंदर्भात मागण्याचे निवेदन पालकमंत्री पोटे यांना सादर केले.
२६ हेक्टरची सिंचन क्षमता
खानापूर येथील गाव तलाव १९९७ मध्ये पूर्ण झाला असून, ०.४० चौ.मै. पाणलोट क्षेत्र आहे. या तलावाची अप्रत्यक्ष सिंचन क्षमता २६ हेक्टर असून, यातून १५ हजार घनमीटर गाळ काढण्यात येणार आहे. हा गाळ काढल्यानंतर १५ घ.मी. पाणी साठ्यात वाढ होणार आहे.