आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दहावीतील १५३ कॉपी बहाद्दरांची बोर्डात हजेरी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती - महाराष्ट्र राज्य माध्यमिक उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून फेब्रुवारी मार्च महिन्यात घेण्यात आलेल्या दहावीच्या परीक्षेत अमरावती विभागात तब्बल १५३ विद्यार्थी कॉपी करताना आढळून आले होते. या १५३ विद्यार्थ्यांची बोर्डाकडून गुरुवारी (दि.2 ) चौकशी करण्यात आली.

चौकशीअंती समितीकडून आलेल्या शिफारसीनंतर दोषी विद्यार्थ्यांवर कारवाई केली जाणार आहे.
फेब्रुवारी मार्च महिन्यात दहावी बारावीच्या परीक्षा अमरावती विभागीय बोर्डाकडून घेण्यात आल्या. विभागातील पाच जिल्ह्यांत दहावीची ६७८, तर बारावीतील ४३१ असे एकूण ११०९ केंद्रांवरून परीक्षा घेण्यात आली. दहावीची परीक्षा एक लाख ९२ हजार ७३१, तर बारावीची परीक्षा एक लाख २७ हजार ३३१ विद्यार्थ्यांनी दिली. कॉपी मुक्त अभियान असतानादेखील अमरावती बोर्डा अंतर्गत मोठ्या प्रमाणात कॉपीची प्रकरणे समोर येत आहेत.
बारावीमध्ये ६३, तर दहावीत १५३ अशी एकूण २१६ कॉपीची प्रकरणे समोर आली होती. शिवाय विभागीय कार्यालय असलेल्या अमरावती जिल्ह्यात मोठ्या संख्येने विद्यार्थ्यांवर कारवाई करण्यात आली आहे. बारावीच्या परीक्षेत कॉपी करणा-या ६३ विद्यार्थ्यांची चौकशी सोमवारी (िद. ३० मार्च) करण्यात आली. चौकशी दरम्यान प्रकरणातील तथ्याची पडताळणी समितीकडून केली जाणार आहे. चौकशी अहवालातील शिफारशी तदर्थ समितीकडे पाठवल्या जाणार आहे. त्यानंतर कॉपी प्रकरणात दोषी आढळलेल्या विद्यार्थ्यांवर कारवाई निश्चित केली जाईल.