आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • 16 Million Voters Have 2,700 Bottles Of Ink, Divya Marathi

16 लाख मतदारांच्या बोटांवर लागणार 2,700 बॉटल शाई

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती- येत्या दहा एप्रिल रोजी होणार्‍या लोकसभा निवडणुकीच्या मतदान प्रक्रियेसाठी लागणारी व मतदान केल्याची ओळख दर्शवणारी खास शाई जिल्हाधिकारी कार्यालयाला प्राप्त झाली आहे. या निवडणुकीत शहरासह अमरावती मतदारसंघातील सुमारे 16 लाख मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. याकरिता जिल्हा निवडणूक निर्णय अधिकार्‍यांमार्फत एका केंद्रावर एक याप्रमाणे 2,700 केंद्रांना 2,700 शाई बॉटल मिळणार आहेत. एका बॉटलमधील शाई ही एक हजार मतदारांच्या तर्जनीवर लावण्यास पुरेशी असल्याचे सूत्रांनी सांगितले.
प्रत्येक बॉटलमध्ये 10 मिलीलिटर शाई राहणार आहे. त्या बॉटल राज्य निवडणूक आयोगाकडून पुरवल्या जातात. खास निवडणुकीत वापरली जाणारी ही विशिष्ट प्रकारची शाई बाजारात कुठेही उपलब्ध होत नाही. राज्य निवडणूक आयोगाने खास म्हैसूर येथून ही शाई मागवली आहे. म्हैसूर पेंट्स आणि वॉर्निश लिमिटेडमार्फत बनवलेली ही
शाई राज्य निवडणूक आयोगाकडून प्रत्येक लोकसभा मतदारसंघाच्या मुख्यालयाला प्राप्त होते व तेथून वितरित केली जाते.
विशेष म्हणजे, बॉटलमधील ही शाई मुळात जांभळ्य़ा रंगाची असते. मतदान करतेवेळी मतदाराच्या बोटावर लावल्यानंतर जांभळ्या रंगाची शाई काळ्या रंगाची होते, हे तिचे खास वैशिष्ट्य आहे. एकदा बोटावर उमटलेली शाई साधारणत: महिनाभर तशीच राहते. गैरप्रकार टाळण्यासाठी तसेच पुनर्मतदान होऊ नये, यासाठी या शाईचा वापर केला जातो. सहजासहजी ही शाई मिटवली जाणे प्रथमदर्शनी शक्यच नाही. लोकशाहीच्या बळकटीसाठी सशक्त उमेदवार निवडीत ही शाई महत्त्वाची भूमिका बजावते. 10 एप्रिलला सुमारे 16 लाख मतदार आपला मतदानाचा हक्क बजावतील. त्यावेळी ही शाई किमयागार राहणार