आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निघाली कॉलेजला, पोहोचली सोलापूरला

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती - घरातून कॉलेजसाठी निघालेली 17 वर्षीय युवती त्या दिवशी घरी न पोहोचता दुसर्‍या दिवशी थेट सोलापुरातील शाळेनजीकच्या मैदानात सापडली. खोलापुरी गेट पोलिसांना माहिती मिळताच शनिवारी रात्रीच पोलिसांचे पथक सोलापूरला रवाना झाले आहे. रविवारी दुपारी सोलापूर येथे खोलापुरी गेट पोलिसांनी युवतीला ताब्यात घेतले आहे.
ही युवती खोलापुरी गेट पोलिस ठाण्याच्या परिसरात राहते. गुरुवारी सकाळी अकरा वाजता ती कॉलेजसाठी निघाली, मात्र सायंकाळी घरी पोहोचलीच नाही. कुटुंबीयांनी शोध घेतल्यावरही तिचा पत्ता लागला नाही. त्यामुळे उशिरा रात्री खोलापुरी गेट पोलिसांत मुलगी हरवल्याची तक्रार दिली. पोलिसांनी तिचा शोध सुरू केला.
शनिवारी रात्री सोलापुरात शाळेनजीकच्या मैदानात ती बसल्याची माहिती सोलापूर पोलिसांकडून प्राप्त झाली. तेथील पोलिसांनी चौकशी केली असता, तिने अमरावतीचा पत्ता सांगितला. ती मित्राला भेटायला तेथे गेली असावी, असा अंदाज आहे. तत्पूर्वी युवतीच्या शोधासाठी गुरुवारी रात्रीपासून खोलापुरी गेट पोलिस आणि नातेवाइकांनी तिच्या शोधात चांगलीच पायपीट केली. अमरावती पोलिसांचे पथक सोलापूर येथून सोमवारी निघणार आहेत.
आमच्या पथकाने युवतीला सोलापूर येथून ताब्यात घेतले आहे. त्या युवतीचा मित्र असलेल्या युवकालाही चौकशीसाठी शहरात घेऊन येणार आहोत. युवती सोलापूरला कशी, कशासाठी गेली, याची चौकशी करण्यात येणार आहे. बळीराम डाखोरे, ठाणेदार, खोलापुरीगेट.

ही युवती सोलापुरात एका मुलासोबत आढळली. युवक सोलापूरचाच असून तो तिचा मित्र असावा, असा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. मुलगा-मुलगी बसलेले दिसल्याने चौकशीसाठी ताब्यात घेतले असताना ती अमरावती येथील रहिवासी असल्याचे पोलिसांना सांगितले.