आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • 2 Days Water A Taping Water Stop Issue At Amravati

अर्ध्या शहराचा पाणीपुरवठा असणार दोन दिवस बंद

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती - अर्ध्याशहराचा पाणीपुरवठा तब्बल दोन दिवस बंद राहणार आहे. चार ठिकाणी दुरुस्ती कार्य केले जाणार असल्याने रविवारी (२१ डिसेंबर) सोमवारी (२२ डिसेंबर) नागरिकांना पाण्यापासून वंचित राहावे लागणार आहे.
राजापेठ, राजकमल, भीमटेकडी, महादेवखोरी, मायानगर, साईनगर, सार्तुणा, बडनेरा आदी भागांत दोन पाणीपुरवठा होणार नसल्याचे महाराष्ट्र जीवन प्राधिकरणकडून स्पष्ट करण्यात आले आहे. तपोवन येथील जलशुद्धीकरण केंद्र, भीमटेकडी येथील जलवाहिनी दुरुस्तीचे कार्य केले जाणार आहे. बडनेरा नवी वस्ती येथील पाण्याच्या टाकीजवळील ‘लीक’ झालेल्या जलवाहिनीच्या दुरुस्तीचे कार्य केले जाणार असल्याची माहिती आहे.