आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भरधाव कारचालकाने दोन युवकांना चिरडले

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती - कारचालकाने आपले वाहन भरधाव निष्काळजीपणे चालवून गुरुवारी रात्री साडेअकराच्या सुमारास गावी जाण्यासाठी चौकात उभे असलेल्या दोन युवकांना चिरडले.यामध्ये दोन्ही युवक गंभीर जखमी झाल्याचे पाहून चालक कारसह घटनास्थळावरून पसार झाला. मात्र, काही अंतरावर गेल्यावर अपघातग्रस्त कार अचानक बंद पडल्याने चालक पोिलसांच्या हाती लागला. पंचवटी चौकामध्ये ही घटना घडली. मंगेश गजाननराव ढोले (२२) आणि गजेंद्र सुखदेव गोसावी (२३), हे दोघेही जखमी युवक पुसदा येथील रहिवासी असून, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
मंगेश आणि गजेंद्र हे दोघेजण गावी जाण्यासाठी अमरावती येथे पंचवटी चौकामध्ये थांबले होते. त्या वेळी भरधाव कारचालक इर्विन चौकातून नांदगावपेठच्या दिशेने जात होता. पंचवटी चौकात चालकाचे कारवरील नियंत्रण सुटल्याने वरील दोन युवकांना कारने चिरडले. धडक इतकी भीषण होती, की यामध्ये एक युवक अक्षरश: गाडीवरून हवेत फेकला गेला पुन्हा गाडीच्या समोरच्या काचेवर आदळला, तर दुसऱ्या युवकाच्या पायावरून गाडी गेल्याने त्याच्या दोन्ही पायांना गंभीर दुखापत झाली. चौकातील नागरिकांनी त्याला पकडण्याचा अपयशी प्रयत्न केला. दोन युवकांना गाडीखाली चिरडून कारचालक घटनास्थळावरून पसार झाला. त्यानंतर नागरिकांनी पोलिसांना घटनेची माहिती दिली. पसार झालेल्या चालकाची कार कृषी महाविद्यालयासमोर अचानक बंद पडल्याने वाहतूक पोिलसांनी त्याला ताब्यात घेऊन गाडगेनगर पोिलसांच्या स्वाधीन केले. उशिरा रात्री एक वाजेपर्यंत वाहनचालकावर पोलिसांची कारवाई सुरू होती.

वाहतूक पोलिसांनी दाखवली सतर्कता
अपघातझाल्यानंतर लगेचच पोलिसांना माहिती मिळाली. तेव्हा वाहतूक शाखेतील काही कर्मचारी त्याच परिसरात कर्तव्यावर होते. वाहतूक पोिलसांनी कारचालकाचा शोध घेत पुढे गेले असता, कृषी महाविद्यालयासमोर अपघातग्रस्त कार बंद पडलेल्या अवस्थेत आढळली. तेव्हा वाहतूक पोिलसांनी कारचालक ताब्यात घेतले. या वेळी नांदगावपेठ पोलिस ठाण्याचे कमांडो उमाकांत आसोलरकर अमोल देशमुख उपस्थित होते.