आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कार्यशाळेत 200 महिलांनी घेतले उद्योजकतेचे धडे

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती-अखिल भारतीय स्थानिक स्वराज्य संस्थांचे विभागीय नागरी व पर्यावरण संशोधन केंद्र (मुंबई) आणि उद्योगलक्ष्मी (पुणे) यांच्या संयुक्त विद्यमाने महापालिकेच्या टाउन हॉलमध्ये गुरुवारपासून महिलांसाठी उद्योजकता प्रशिक्षण कार्यक्रमाला सुरुवात झाली.
राज्यभर आयोजित करण्यात आलेल्या कार्यशाळेच्या मालिकेला अमरावतीपासून सुरुवात झाली आहे. कार्यशाळेत 200 महिला सहभागी झाल्या असून, नगरपरिषद प्रशासन संचालनालयाच्या सहकार्याने हे आयोजन करण्यात आले आहे. महिलांनी उत्पादनांचे विपणन कसे करावे, आपले उत्पादन आकर्षक बनवण्यासाठी बारकोडिंग, पॅकिंग कशी असावी, स्थानिक बाजारपेठेपासून ते आंतरराष्ट्रीय बाजारात कसा प्रवास करावा, या विषयी पहिल्या सत्रात मार्गदर्शन करण्यात आले.
अन्न-फळप्रक्रिया आणि कृषिक्षेत्रातील उद्योगांना लागणारे आर्थिक साहाय्य देणार्‍या शासकीय सुविधा यांसारख्या विविध विषयांवर तज्ज्ञांनी मार्गदर्शन केले. बचतगटांच्या महिला मोठय़ा प्रमाणात या कार्यक्रमात सहभागी होत्या. सकाळी कार्यशाळेचा उद्घाटन सोहळा पार पडला.
महापौर वंदना कंगाले, उपायुक्त रमेश मवासी, सहायक आयुक्त नरेंद्र वानखडे, उद्योगलक्ष्मी बिझनेस फाउंडेशनच्या डायरेक्टर नीलिमा तपस्वी, प्रकल्प संचालक वंदना गुल्हाने यांची या कार्यक्रमात उपस्थिती होती. नीलिमा तपस्वी, महेंद्र टेकाडे यांच्यासह अनेक तज्ज्ञांनी महिलांना मार्गदर्शन केले. या कार्यक्रमादरम्यान महिलांनी विविध उद्योगांसदर्भात शंका उपस्थित केल्या. तपस्वी यांनी महिलांच्या प्र्नांना उत्तरे देऊन त्यांचे शंकानिरसन केले.
पुस्तकांचे वाटप
विविध 151 उत्पादने तयार करण्यासाठी मार्गदर्शक असे ‘उद्योग सरिता’ आणि ‘बिझनेस मॅनेजमेंट अँड मार्केटिंग’ हे नीलिमा तपस्वी लिखित पुस्तके या कार्यशाळेत महिलांना देण्यात आली. सुगंधी क्रीम, फेस पावडर, चंदन-आवळा तेल, रबरी शिक्के अशा विविध छोटेखानी उत्पादनांची माहिती या पुस्तकांमध्ये देण्यात आली आहे.