आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अमरावती शहरात मुक्कामी अाहेत तब्बल २०९ विदेशी पाहुणे

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती - शहरात मागील अनेक वर्षांपासून तब्बल २०९ विदेशी नागरिकांचे वास्तव्य आहे. या नागरिकांसह इतर विदेशी नागरिकही असतील आणि त्यांना दीर्घ मुदत व्हिसा आणि प्रथम दीर्घ मुदत व्हिसा मंजुरीबाबत पोलिस आयुक्तालयात दोन दिवसीय विशेष शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिरादरम्यान केन्द्र राज्य शासनाचे अधिकारी उपस्थित राहणार आहेत.
अमरावती शहर जिल्ह्यात वास्तव्य करत असलेल्या विदेशी नागरिकांना मुदती व्हिसा, प्रथम दीर्घ व्हिसा किंवा भारतीय नागरिकत्व याबाबतीत आवश्यक असे दोन दिवसीय शिबिर आहे. हे शिबिर २९ आणि ३० जूनला सकाळी साडेदहा ते सायंकाळी पाच या वेळेत होणार आहे. या शिबिरासाठी केन्द्रीय गृह विभागाचे उपसचिव देबाप्रसाद त्रिपाठी यांच्यासह राज्य गृह विभागाचे अधिकारी, पोलिस अधिकारी उपस्थित राहणार आहे. या संदर्भात असलेल्या अडचणी इतर समास्यांबाबत माहिती घेण्यासाठी शहर जिल्ह्यातील विदेशी नागरिकांनी मुळ कागदपत्रांसह उपस्थित राहण्याचे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.
विदेशी नागरिकांना दीर्घ काळ वास्तव्य करायचे आवश्यक असलेल्या व्हिसा प्राप्तीसाठी त्यांना केंद्र सरकारकडे अर्ज करावा लागतो, त्यानंतर केंद्राकडून राज्य शासनाकडे अर्ज येतो. अलीकडच्या काळात पहिल्यांदाच होत असलेल्या या शिबिरामुळे विदेशी नागरिकांच्या अनेक समस्या अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनामुळे सुटण्याची शक्यता आहे. शहर ग्रामीण पोलिसांना याबाबत माहिती दिली आहे. जेणेकरून जिल्ह्यातील विदेशी नागरिकांनाही लाभ घेता यावा, हा त्यामागचा उद्देश आहे. अशी माहिती शहर पोलिसांच्या सूत्रांनी दिली आहे.

नागरिकत्वासाठी दहा वर्षांत १८१ अर्ज
ज्याविदेशीनागरिकांना कायस्वरूपी यापुढील काळात भारतात राहायचे असेल त्यांना भारतीय नागरिकत्व घ्यावे लागते. नागरिकत्वासाठी जिल्हाधिकाऱ्यांकडे अर्ज करावा लागतो. भारतीय नागरिकत्व प्राप्त करण्यासाठी विदेशींसाठी काही अटींची पुर्तता करावी लागते. त्यापैकीच एक म्हणजे किमान सात वर्ष भारतात राहणे आवश्यक आहे. २००५ ते २०१५ या दहा वर्षांच्या काळात अमरावती शहर जिल्ह्यातील १८१ नागरिकांनी भारतीय नागरिकत्वासाठी जिल्हाधिकाऱ्यांकडे अर्ज केले आहेत. अर्ज केल्यानंतर संबधित व्यक्तींना जिल्हाधिकाऱ्यांसमक्ष स्वाक्षरी करावी लागते. त्यानंतरच या अर्जाचा पुढील प्रवास सुरू होतो. अशी माहिती जिल्हाधिकारी कार्यालयातील सूत्रांनी दिली आहे.
बातम्या आणखी आहेत...