आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अमरावती महापािलकेकडून २१.५० कोटी रुपयांची वसुली

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती - महापालिकेत स्थानिक संस्था करानंतर महत्त्वपूर्ण उत्पन्नाचे माध्यम हे मालमत्ता कर आहे. मात्र, मागील काही वर्षांत मालमत्ता कर वसुलीकडे दुर्लक्ष होत गेल्याने अपेक्षित असलेले उत्पन्नदेखील महापालिकेला प्राप्त करता आले नाही.
एकूण मागणीच्या ५० टक्केदेखील मालमत्ता कराची वसुली एका आर्थिक वर्षात पूर्ण होत नसल्याचे चित्र होते. त्यामुळे संपूर्ण वर्षभर मालमत्ता कर वसुली होण्यासाठी कार्यरत राहण्याची वेळ प्रशासनावर येत होती.

वॉर्ड लिपिकांकडून मालमत्ता कर वसूल करण्यात कुचराई होत असल्याचेदेखील निदर्शनास येत होते. एलबीटी विरोधात व्यापारी एकवटल्यानंतर महापालिकेचे उत्पन्न मोठ्या प्रमाणात कमी झाले. उत्पन्न वाढावे म्हणून अन्य महत्त्वपूर्ण स्रोत असलेले मालमत्ता कर आणि बाजार परवाना विभागाकडे आयुक्त अरुण डोंगरे यांनी लक्ष केंद्रित केले. वॉर्ड लिपिकांसह मालमत्ता कर विभागातील सर्व अधिकारी-कर्मचाऱ्यांची एकत्रित बैठक बोलावण्यात आली होती.
मालमत्ता कर वसुलीत हयगय केल्यास वॉर्ड लिपिकांवर कारवाई करण्याचे संकेतदेखील आयुक्तांनी दिले होते. एलबीटीला पर्याय म्हणून मालमत्ता कर विभागाला सक्षम करण्याचे प्रयत्न आयुक्तांकडून केले जात आहे. यावर्षी मालमत्ता कर वसुलीत झालेली ११ वाढ आयुक्तांकडून करण्यात आलेल्या बदलाचा परिपाक आहे.

उपक्रमांचा प्रभाव

मालमत्ताकर वाढवण्यासाठी पालिकेकडून विविध उपक्रम राबवण्यात आले. त्यामध्ये सुटीच्या दिवशी शिबिरांचे आयोजन करणे, ऑन दी स्पॉट असेसमेंट, की-ऑस्क प्रणाली, ऑनलाइन पेमेंट गेट-वे, वॉर्डात दिलेल्या स्वाइप डिवाइस मशीन यांचा समावेश आहे. शिवाय उत्कृष्ट कार्य करणाऱ्या वॉर्ड लिपिकाचा सत्कारदेखील केला जातो.

बडनेरा झोन आघाडीवर

मालमत्ताकर वसुलीत सद्य:स्थितीत बडनेरा झोन कार्यालय आघाडीवर असल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट होते. आठ कोटी ७१ लाख रुपयांची एकूण मागणी असलेल्या प्रभागात १६ फेब्रुवारी १५ पर्यंत पाच कोटी ३८ लाख रुपयांची वसुली करण्यात आली. ज्याची टक्केवारी ६१.८३ ऐवढी आहे. त्या खालोखाल उत्तर झोनची वसुली दिसून येते.

पुढे काय : आर्थिकवर्ष संपण्यास दीड महिन्यांचा कालावधी शिल्लक असून, यादरम्यान अधिकाधिक वसुलीकडे महापालिकेकडून लक्ष केंद्रित केले जाईल. १७.४६ कोटी रुपयांची वसुली महापालिका प्रशासनास करावयाची असून, त्यासाठी मोठ्या प्रमाणात शिबिरे घेतली जाणार आहेत. शिवाय मालमत्ता धारकांकडून दंड देखील वसूल केला जाईल.


योग्य नियोजनाचा लाभ

^योग्य नियोजन करण्यात आल्याने मालमत्ता कर वसुलीचा टक्का वाढला आहे. मालमत्ता कराबाबत वॉर्डनिहाय याद्या यावेळेस लवकर तयार करीत सर्व झोन कार्यालयांना देण्यात आल्या. त्यामुळे नागरिकांना मालमत्ता कर पावती वेळेपूर्वी मिळाली. शिवाय सुटींच्या दिवशी विविध भागांमध्ये घेण्यात आलेल्या शिबिरांमुळे मालमत्ता कर वाढण्यास मदत झाली. अरुणडोंगरे, आयुक्त महापालिका, अमरावती