आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • 250 Police Mens Transfer Toady In Amaravati Commissioner Office

आयुक्तालयातील २५० पोलिसांची आज बदली

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती - पोलिस आयुक्तालयातील एकाच पोलिस ठाण्यामध्ये पाच वर्ष पुर्ण झालेल्या पोलिसांची बदली शुक्रवारी करण्यात येणार आहे. पोलिस शिपाई ते सहायक पोलिस उपनिरीक्षक पदापर्यंतच्या २५० कर्मचाऱ्यांचा या बदलीप्रक्रीयेमध्ये समावेश आहे. बदली झालेल्या कर्मचाऱ्यांच्या नावांची यादी शुक्रवारी (दि. २४) जाहीर होणार आहे.

सर्वसाधारण बदली प्रक्रीयेचा हंगाम आता सुरू झाला आहे. सर्वच शासकिय विभागात बदली प्रकीया सुरू झाल्या आहेत. पोलिस आयुक्तालयातील २५० कर्मचाऱ्यांची बदली यादी शुक्रवारी जाहीर करण्यात येणार आहे. अशी माहीती प्रभारी पोलिस आयुक्त सोमनाथ घार्गे यांनी दिली आहे.