आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वैधानिक मंडळाकडे ३० कोटींची मागणी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती- तिजोरीत भर घालण्याच्या दृष्टीने सुरू असलेली मनपा प्रशासनाची कवायत विदर्भ वैधानिक विकास मंडळापर्यंत पोहोचली असून मंडळाकडे विविध दहा प्रकल्पांसाठी सुमारे ३० कोटी रुपयांची मागणी करण्यात आली आहे.
सोलापूरचे आयुक्त असताना गुडेवार यांनी तेथील वैधानिक विकास मंडळातर्फे काही प्रकल्पांसाठी निधी मिळवला होता. तेच सूत्र वापरून विदर्भ वैधानिक विकास मंडळाकडूनही निधी मिळविण्याची त्यांची योजना आहे. यासाठी बडनेरा झोनचे सहाय्यक आयुक्त राहुल ओगले प्रकल्पासाठीचा डाटा तयार करण्यात पटाईत असलेले प्रायव्हेट कन्सलटंट संजय देशमुख यांच्या खांद्यावर जबाबदारी सोपविण्यात आली आहे. दरम्यान ओगले देशमुख यांनी मिळून एक-दोन नव्हे तर तब्बल दहा प्रकल्पांचे अहवाल विदर्भ वैधानिक विकास मंडळाकडे सोपविले आहे.
मंडळाच्या नागपूर येथील कार्यालयात जाऊन त्यांनी स्वत: या प्रकल्पांचा डेमो सीईओं समक्ष सादर केला. त्यामुळे काही प्रकल्पांसाठी हमखास निधी मिळेल, अशी खात्री निर्माण झाली आहे.
राष्ट्रीय जीवनोन्नती अभियानांतर्गत चालविले जाणारे महिला सक्षमीकरणाचे प्रकल्प, मनपाच्या लोकोपयोगी योजनांना गती मिळेल असे काही प्रकल्प, आर्थिकदृष्ट्या कमकुवत घटकांत मोडणाऱ्या नागरिकांचे जीवनमान उंचावण्यासाठीचे प्रकल्प आदींचा या सादरीकरणात समावेश आहे.
सादरीकरणात या प्रकल्पांचा आहे समावेश
राष्ट्रीय जीवनोन्नती अभियानांतर्गत चालविले जाणारे महिला सक्षमीकरणाचे प्रकल्प, मनपाच्या लोकोपयोगी योजनांना गती मिळेल असे काही प्रकल्प, आर्थिकदृष्ट्या कमकुवत घटकांत मोडणाऱ्या नागरिकांचे जीवनमान उंचावण्यासाठीचे प्रकल्प आदींचा समावेश आहे.
एका प्रकल्पासाठी कमाल तीन कोटींची मदत
एका प्रकल्पाला जास्तीत जास्त तीन कोटी रुपयांची मदत विदर्भ वैधानिक विकास मंडळ करू शकते. त्यामुळे यातील प्रत्येक प्रकल्प त्या चौकटीत बसविण्यात आला असून त्यातील निम्म्या प्रकल्पांना जरी निधी द्यायचे ठरविले गेले तरी िकमान १५ कोटी रुपयांची भर मनपाच्या तिजोरीत पडणार आहे.