आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जबलपूर एक्स्प्रेस 30 पासून रुळावर

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती- इटारसीजवळ झालेल्या तांत्रिक बिघाडामुळे अमरावती-जबलपूर सुपरफास्ट एक्सप्रेस तब्बल १७ जूनपासून रद्द करण्यात आली आहे. परंतु तांत्रिक काम जवळपास अंतिम टप्प्यात असून ३० जूनपासून ही गाडी पुन्हा रुळावर येणार असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे.
दरम्यान, पॅनलमध्ये आग लागल्याने मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले होते. त्यामुळे ही गाडी रद्द करण्यात आली होती. परिणामी, ३० जूनपासून प्रवाशांना पुन्हा या गाडीने प्रवास करता येणार आहे.
रेल्वे सुत्रांनी दिलेल्या माहितीवरून, गाडी रद्द झाल्याने मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. जवळपास १३ दिवस ही गाडी रद्द झाल्याने रेल्वे विभागाला ९ते १० लाख रुपयांपर्यंत नुकसान होणार असल्याचे सुत्रांचे म्हणणे आहे. तथापि, गाडी रद्द झाली असून देखील ज्या प्रवाशांनी ऑनलाईन आरक्षण खिडकीवरून आरक्षण केले होते, अशा प्रवाशांना पूर्ण परतफेड करण्यात आल्याचे सुत्रांचे म्हणणे आहे. परंतु ज्या प्रवाशांनी या कालावधीत नियोजन केले होते, त्यांचे संपुर्ण नियोजन विस्कळीत झाले असून महत्त्वाचे काम रखडल्याचे प्रवाशांनी सांगितले. दुसरीकडे ३० जूनपासून गाडी सुरू होणार असल्याने प्रवाशांनी पुन्हा नियोजन केले आहे.
प्रवाशांमध्ये आनंदाचे वातावरण ३० जूननंतर आरक्षण करणाऱ्यांची फलाटावर गर्दी होत आहे.
नऊलाखांचे झाले नुकसान : तब्बल१३ दिवस ही गाडी रद्द झाल्याने नऊ लाखांचा तोटा झाल्याचे सुत्रांनी सांगितले. जबलपूरसाठी दररोज आरक्षण खिडकीतून ३० ऑनलाईन ३० असे ६० आरक्षण होते. सामान्य तिकिटांची संख्या ही १५० इतकी आहे.

गाडीला आहेत १९ थांबे
अमरावती-जबलपूर ही दररोज अमरावती स्थानकावरून सायंकाळी पावणेसहा वाजता जबलपूर येथे जाण्यासाठी सुटते. दुसऱ्या दिवशी ठिक सकाळी सात वाजता ही जबलपूर रेल्वे स्थानकावर पोहचते. या प्रवासादरम्यान ही गाडी १९ स्थानकावर थांबते. अमरावती ते जबलपूर रेल्वेचे अंतर हे ७२५ किलोमीटर इतके अाहे.

प्रवाशांची रखडली कामे
१७जूनपासून ही गाडी रद्द झाली असल्याने प्रवाशांची चांगलीच तारांबळ उडाली आहे. गाडी रद्द झाल्याने रेल्वे विभागाकडून प्रवाशांना पैसे परत करण्यात आले असले तरी वेळेवर गाडी रद्द झाल्याने अनेक महत्त्वाचे काम रखडल्याचे मत प्रवाशांनी व्यक्त केले. गाडी रद्द झाल्यामुळे मोठ्या प्रमाणावर आर्थिक मानसिक त्रास झाल्याचे प्रवाशांनी दै. दिव्य मराठीशी बोलताना सांगितले.
बातम्या आणखी आहेत...