आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एसटी बसला अपघात;३१ प्रवासी जखमी, चालकाचे नियंत्रण सुटल्याने खड्ड्यात आदळली गाडी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
परतवाडा - चालकाचे नियंत्रण सुटल्याने बस रस्त्याच्या बाजूला असलेल्या मोठ्या खड्यात जाऊन आदळली. या भीषण अपघातात जवळपास ३१ प्रवाशी जखमी झाले असून यातील आठ जण गंभीर जखमी झाले आहेत. यामध्ये काही प्रवाशांना किरकोळ, तर काही प्रवाशांना जबर मार लागला आहे. रुईपठार-परतवाडा मार्गावर ही घटना शुक्रवारी (दि. २४) दुपारी एकच्या सुमारास घडली. जखमींवर अचलपूर आणि अमरावती येथे उपचार सुरू आहेत.
परतवाडा आगारांतर्गत येणाऱ्या रुईपठार-परतवाडा बस (क्रमांक ४०/ ८५२६) रुईपठारकडून परतवाड्याकडे रवाना होत होती. दरम्यान, दुपारी एक वाजताच्या सुमारास बसचालक संतोष थोरात यांचे स्टेअरिंवरील नियंत्रण सुटले आणि बस रस्त्याच्या खोल खड्डयात जाऊन आदळली. हा अपघात इतका भीषण होता की, बस या अपघातात पुर्णता: चक्काचूर झाली. दरम्यान, या अपघातात चालक संतोष थोरात (कांडली), श्रीराम बेठेकर (भांडूप), सुखलाल काकडे (दह्यांद्री), सतुंलाल धाडे (रायपूर), रूखा बेठे (माखला), शेवंतीबाई सरकटे (गौरखेडा), विश्राम आठवा (कुर्ला), आशा बुरगुंडे (पथ्रोट) हे गंभीर जखमी झाली असून, कैलास दीपक देवरणकर (२९, पूर्णा), मधुकर नारायण दाडेंकर (६६, पुणे), रामेश्वर नारायण चिमोटे (५४, भिलोरी), रत्ना पुण्या बेलसरे (१५, भुसंडी), माहेश्वरी गजानन बारखडे (१८, सलोना), सुखदेव मलंग्गा बेठेकर (२०, कुट्टी), प्रिती तांडेलकर (१५, कुट्टी), ललिता धिक्कार (१८, रायपूर), भुगेला मावस्कर (५५, भांद्री), कुडीया कोगे (३६, रायपूर), सहदेव शेषराव मोरे (२४, देह्याद्री), कनान संतोष तांडेकर (७५, रामपूर), रामसुमर दुवे (४०, कुटी), फुलवा संतोष कास्देकर (४५, बऱ्हानपूर) आदी जखमी झाले आहेत. यांपैकी सहा जणांना अमरावती येथे उपचारासाठी हलवण्यात आले असून, उर्वरित जखमींवर अचलपूर उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याप्रकरणी चिखलदरा पोलिस ठाण्यात बसचालक थोरातविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
बातम्या आणखी आहेत...