आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दुकानात फार्मासिस्ट नसल्याने 318 जणांवर केली कारवाई

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अमरावती- अन्न व औषधी प्रशासनाने भरारी पथके स्थापन करून अमरावती विभागात औषधी दुकानांची तपासणी सुरू केली आहे. फार्मासिस्ट हजर नसल्याने तब्बल 318 औषधी दुकानांच्या संचालकांवर कारवाई करण्यात आली. त्यापैकी 146 जणांचे औषधविक्रीचे परवाने रद्द केले, तर 172 परवाने निलंबित करण्यात आले आहेत.

औषध ही प्रत्येक रुग्णाची गरज आहे. ते डॉक्टरांच्या सल्ल्याप्रमाणेच रुग्णाला दिले जाणे आवश्यक आहे. त्यामुळे फार्मसीची पदवी किंवा पदविका मिळवलेल्या व्यक्तीलाच औषधविक्रीचा परवाना अन्न व औषधी प्रशासनाकडून दिला जातो. मात्र, काही औषधी दुकानांमध्ये परवानाधारकाव्यतिरिक्त अन्य व्यक्ती बसून व्यवसाय करतात, अशी बाब प्रशासनाच्या लक्षात आल्यामुळे भरारी पथकांची निर्मिर्ती करण्यात आली आहे. या पथकाने एप्रिलपासून 15 सप्टेंबरपर्यंत विभागातील पाचही जिल्ह्यांत एकूण 2001 औषधी दुकानांची तपासणी केली. यावेळी 318 दुकानांमध्ये फार्मासिस्ट हजर नव्हते किंवा काहींनी केवळ परवाना घेतला होता, व्यवसाय इतरांकडून केला जातो. अशा फार्मासिस्ट आणि औषधी दुकानांवर कारवाईचा बडगा उगारला गेला आहे.

300 जणांनी स्वत:हून परत केले परवाने
अन्न व औषधी प्रशासनाने राबवलेल्या मोहिमेमुळे जे परवानाधारक स्वत: औषधी दुकानांमध्ये बसत नाही किंवा त्यांचे औषधी दुकान सुरू नाही, अशा तब्बल 300 जणांनी स्वत:हून अन्न व औषधी प्रशासनाकडे परवाने परत केले आहेत.

जिल्हा परवाना निलंबन रद्द
अमरावती 460 22 37
अकोला-वाशीम 555 87 38
यवतमाळ 528 41 42
बुलडाणा 458 22 29
एकूण 2001 172 146

फार्मासिस्ट आवश्यकच
फार्मासिस्ट पूर्णवेळ असणे आवश्यक आहे. भरारी पथक कोणत्याही क्षणी तपासणी करेल. रविवारीसुद्धा कारवाई होईल.एप्रिलपासून 2001 औषधी दुकानांच्या तपासणीत 172 परवाने निलंबित, तर 146 परवाने रद्द केले आहेत.
-गिरीश उकरे, सहायक आयुक्त, औषधी प्रशासन.