आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • 32 Irrigation Project Incompletes Lacking Of Canals

कालव्यांअभावी ३२ सिंचन प्रकल्प अपूर्ण

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती - विभागातील३२ प्रकल्पांचे बांधकाम शंभर टक्के पूर्ण झाल्यानंतरही केवळ वितरिकांची कामे अपूर्ण असल्याने प्रकल्प रखडल्याची माहिती जलसंपदा विभागाच्या वार्षिक प्रगती अहवालात दिली आहे.विभागातील १९१ सिंचन प्रकल्प अपूर्णावस्थेत आहेत. यापैकी ३२ सिंचन प्रकल्पांचे बांधकाम पूर्ण झाले आहे. मात्र, वितरिकांचे बांधकाम झाले नसल्याने शेतकऱ्यांना सिंचनाच्या पाण्यापासून वंचित राहावे लागत आहे. येत्या तीन वर्षांत वितरिका पूर्ण करण्याचे नियोजन जलसंपदा विभागाने केले आहे. या सर्व वितरिका २०१७ पर्यंत पूर्ण करण्यात येणार आहे. या वर्षीच्या राज्याच्या अर्थसंकल्पात विदर्भ, मराठवाड्यातील रखडलेले सिंचन प्रकल्प पूर्ण करण्याकरिता भरीव तरतूद केली आहे. वितरिकांअभावी अपूर्णावस्थेत असलेले ३२ प्रकल्प पूर्ण झाले, तर विभागात ३६ हजार हेक्टरची अतिरिक्त सिंचन क्षमता निर्माण होणार आहे. या प्रकल्पांमध्ये सर्वाधिक दहा प्रकल्प अमरावती जिल्ह्यातील आहेत, तर त्या खालोखाल यवतमाळ ८, बुलडाणा ८, वाशीम आणि अकोला जिल्ह्यातील प्रकल्पांचे बांधकाम केवळ वितरिकांअभावी पूर्ण होऊ शकले नाही.

बांधकाम अपूर्ण
अमरावतीतीलचंदी नदी प्रकल्प, नागठाणा, झटामझरी, पाक नदी, चांदस वाठोडा, पूर्णा, चंद्रभागा, सपन, कावरा नाला. अकोल्यातील दगडपारवा, वान. वाशीममधील खडकी, कुतरडोह, बोरखेडी, अडाण, बुलडाणातील तोरणा, कोराडी, ब्राह्मणवाडा, सवखेड, विद्रूपा, लोणवडी. यवतमाळातील अंतरगाव, अरुणावती, बेंबळा, वाई, अमडापूर.