आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘त्या’ निर्दयी आईला अद्यापही फुटला नाही ममतेचा पाझर

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती - आठवड्याभरापूर्वी बडनेरा एक्स्प्रेस हायवेवर बेवारस अवस्थेत आढळलेल्या चारदिवसीय चिमुकलीचे आई-वडील अद्यापही सामोरे आले नसल्याने तिला शिशुगृहात ठेवण्यात येणार आहे. पोलिसांनी त्यासाठीच्या प्रक्रियेस सुरुवात केली आहे. सध्या ही चिमुकली जिल्हा स्त्री रुग्णालयात सुरक्षित आहे.

शिशुगृहात ठेवल्यानंतरही सुमारे सहा महिने तिच्या आई-वडिलांची प्रतीक्षा करण्यात येणार आहे. या कालावधीत ते समोर आल्यास न्यायालयात ओळख पटल्यानंतर त्यांना बाळ देण्यात येणार आहे. मात्र, सहा महिन्यांनंतरही आई-वडील समोर न आल्यास चिमुकलीला न्यायालयाच्या परवानगीने ज्यांना दत्तक घ्यायचे आहे, त्यांना घेता येणार आहे.

तूर्तास गाडगेनगर पोलिस गाडगेनगर पोलिस चिमुकलीला शिशुगृहात ठेवण्यासाठी आवश्यक प्रक्रिया पार पाडत आहेत. दरम्यान, विद्यापीठ परिसरातील संकेत कॉलनीला लागून अमरावती-बडनेरा एक्स्प्रेस हायवेवर बंद पडलेला टोलनाका आहे. त्या परिसरात दहा दिवसांपूर्वी रात्री आठ वाजता लहान बाळाचा रडण्याचा आवाज परिसरातील नागरिकांच्या कानावर पडला होता.
येथील रहिवाशांनी पाहणी केली असता, येथे चार दिवसांची चिमुकली रडत असल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यांनी गाडगेनगर पोलिसांना याबाबत माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून बाळ ताब्यात घेतले. त्यानंतर चिमुकलीला जिल्हा स्त्री रुग्णालयात (डफरीन) ठेवण्यात आले होते. या घटनेला आज दहा दिवस होऊनही तिचे आई-वडील समोर आले नाहीत. परिणामी, चिमुकलीला शिशुगृहात ठेवण्याची वेळ पोलिसांवर आली आहे. या घटनेनंतर शहरात खळबळ उडाली होती. या प्रकरणी पोलिसांनी तपास सुरू केला असून, अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा नोंदवला आहे.

चिमुकलीच्या आईचा शोध घेण्यासाठी पोलिसांचे प्रयत्न सुरू आहेत. मात्र, अजूनही बाळाच्या पालकांचा शोध न लागल्याने या चिमुकलीला शिशुगृहात पाठवण्याची वेळ पोलिसांवर आली आहे.
कोणीही आले नाही; शिशुगृहात ठेवणार
- दहा दिवसांपूर्वी सापडलेले बाळ डफरीनमध्ये आहे. अजूनही तिचे आई-वडील समोर आले नाहीत. त्यामुळे बाळाला शिशुगृहात ठेवण्याचा निर्णय घेण्यात आलाय. त्यासाठीची प्रक्रिया सुरू आहे. न्यायालयीन प्रक्रिया पूर्ण करून बाळाला दत्तक देण्याबाबत निर्णय घेणार आहे. शिशिर मानकर, ठाणेदार, गाडगेनगर.