आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • 40 Years Will Stand For The Historical Khaparde Wada \'

40 वर्षे दिमाखात उभा राहील ऐतिहासिक खापर्डे वाडा ’- पुरातत्त्व विभागा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अमरावती- भारतीय पुरातत्त्व विभागानुसार, शहराचे 139 वर्षांचे ऐतिहासिक वैभव असलेला खापर्डे वाडा आणखी 40 वर्षे दिमाखात उभा राहण्याच्या स्थितीत आहे. वाड्यात दुकाने असलेल्या व्यापार्‍यांनी मनपा पक्षनेता बबलू शेखावत यांच्या नेतृत्वात शुक्रवारी मनपा आयुक्त अरुण डोंगरे यांची भेट घेतली. त्यावेळी हा तपशील समोर आला.

इमारत शिकस्त असल्याचे सांगत तीन वर्षांत येथील दुकानदारांना तब्बल 12 नोटीस देण्यात आल्या आहेत. शहराचे हृदयस्थान राजकमल चौक येथे असलेला स्वातंत्र्यलढय़ाचा साक्षीदार खापर्डे वाडा नेस्तनाबूत करण्याचे मनसुबे महानगरपालिकेच्या बांधकाम विभागाने आखले आहेत. त्यादृष्टीने त्यांनी प्रयत्नदेखील केल्याचा आरोप येथील व्यापार्‍यांचा आहे.

शिकस्त इमारत असल्याचे दर्शवून इमारत पाडण्याची कारवाई करता यावी म्हणून पोलिस संरक्षण मागण्यात आले होते. यानंतर भारतीय पुरातत्त्व विभागाच्या पत्राचा आधार घेत व्यापार्‍यांनी आयुक्त डोंगरे यांची भेट घेतली. ऐतिहासिक वाडा तसेच व्यापार्‍यांचे होणारे नुकसान आदी बाबी त्यांच्या निदर्शनात आणून दिल्या. या वेळी माजी नगरसेवक बबन रडके, मोहन निंभोरकर, संजय देशमुख, विकास पाध्ये, श्याम जुनघरे, दिलीप मेहरे, नंदू अनासाने, विनोद रायबागकर, सुधाकर पुंड आदी उपस्थित होते.