आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अमरावतीत 46 हजार मतदारांची नावे मतदान यादीतून गायब, शिवसेनेची तक्रार

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती- अमरावती लोकसभा मतदारसंघातील एका परिसरातील सुमारे 46 हजार लोकांची नावे मतदार यादीतून गायब असल्याचा दावा शिवसेनेचे आमदार अभिजित अडसूळ यांनी केला आहे. त्यामुळे अमरावती तहसील कार्यालयात गोंधळाची स्थिती आहे. एकाच भागातील समुारे 46 हजार मतदारांची नावे अचानक गायब होणे यामागे काही तरी राजकीय षडयंत्र आहे का याची चर्चा सुरु झाली आहे. याप्रकरणी तक्रार करण्यासाठी अभिजित अडसूळ व सुनील पोटे निवडणूक अधिका-यांशी चर्चा करीत आहे.
विदर्भातील अमरावती लोकसभा निवडणुकीने अनोखा रंग घेतला आहे. राष्ट्रवादीने नवनीत राणा कौर यांना उमेदवारी दिली आहे. मात्र नवनीत राणा यांच्यावर जात प्रमाणपत्र बोगस असल्याचा आरोप करण्यात येत आहे. मात्र, आमदार रवी राणा यांनी संपूर्ण ताकद पणाला लावली आहे. त्यामुळे अमरावतीत तीन वेळा खासदार असलेल्या आनंदराव अडसूळ यांच्यासाठी आव्हान उभे केले आहे. याचबरोबर या मतदारसंघात बसपाचे गुणवंत देवपारे, रिपाईचे राजेंद्र गवई अशी चौरंगी लढत होत आहे. यातून लढाईत अडसूळ यांचे पारडे असले तरी राणा यांनी त्यांना हैराण करून सोडले आहे. आता शिवसेनेचे वर्चस्व असलेल्या एका भागातील सुमारे 46 हजार नावे गायब झाल्याने यावरून वाद सुरु झाला आहे. याबाबत शिवसेनेने तक्रार दाखल केली आहे.