आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

२२ जुगाऱ्यांसह अपघात प्रकरणी पाच जणांना शिक्षा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती - पोलिस आयुक्तालयाच्या हद्दीत मागील महिनाभरात दाखल गुन्ह्यांपैकी २१ गुन्ह्यांमध्ये दोषी सिद्ध झालेल्या २२ जुगाऱ्यांसह अपघात करणाऱ्या पाच जणांना न्यायालयाने शिक्षा ठोठावली आहे.

शहरातील दहा पोलिस ठाण्यांमधील गुन्हे तपासाअंती न्यायप्रविष्ट करण्यात आले आहेत. अशाच विविध गुन्ह्यांपैकी एका महिन्यात तब्बल २१ गुन्ह्यांचा निवाडा करताना न्यायालयाने दोषींना शिक्षा सुनावली आहे. गुन्हेगारांना शिक्षा व्हावी, यासाठी मागील काही दिवसांपासून वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी कनिष्ठ स्तरावर वारंवार सूचना दिल्या आहेत. त्यामुळेच तपास करतेवेळी कोणत्याही त्रुटी राहू नये, यासाठी प्रयत्न सुरू आहे. त्यामुळेच तब्बल २१ वेगवेगळ्या गुन्ह्यांमध्ये दोषी आढळलेल्या गुन्हेगारांना न्यायालयाने शिक्षा सुनावली.

पाच जुगारच्या गुन्ह्यात २२ जणांना ३०० रुपये दंड, दंड भरल्यास सात दिवसांची कैद, अपघातात दोषी पाच जणांना हजार २०० ते हजार ७०० रुपये दंड, दंड भरल्यास तीन दिवसांची कैद, तसेच खून प्रकरणात एकाला दहा वर्षे कैद पाच हजार रुपये दंडाची िशक्षा, वाहतूक नियमांचे पालन करणाऱ्या दोघांना दोन हजार ५० रुपये दंड यासह अन्य प्रकरणांमध्ये दोषींना शिक्षा झाली.न्यायालयातील पैरवी अधिकारी कर्मचाऱ्यांना ‘रिवॉर्ड’ घोषित करण्यात आला आहे.