आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चिखलदरात एमटीडीसीचे फाइव्ह स्टार पर्यटन निवास, ११ एप्रिलपासून आरक्षण सुविधा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती - चिखलदरातील मोझरी पॉइंट येथे महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाने फाइव्ह स्टार पर्यटन निवास उभे केले आहे. शनिवारी ११ एप्रिलपासून या पर्यटन निवासात आरक्षण मिळण्यास सुरुवात होणार आहे. यामुळे आता येथील पर्यटन विकासाला चालना मिळणार आहे.
चिखलदरा समुद्र सपाटीपासून सुमारे एक हजार ११८ मीटरवर आहे.
सातपुडा पर्वत रांगांमध्ये असल्याने चिखलदरा नेहमीच पर्यटकांच्या आकर्षणाचे केंद्र राहिले आहे. त्यामुळे महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाने येथे निवास व्यवस्था करण्यास सुरुवात केली होती.नव्या पर्यटन निवासात मिळेल

११ एप्रिलपासून आरक्षण सुविधा

उपलब्ध सुविधा
एसी व्हीआयपी सूट १०
एसी डिलक्स सूट ०१
उपाहार गृह ०१
कॉन्फरन्स हॉल, रिक्रिएशन हॉल, योगा व ध्यान केंद्र.
मुबलक वनसंपदा
परिसरात वाघ, मोर, रानकोंबड्या, अस्वल, हरीण आदी प्राणी, पक्षी मुक्त संचार करताना दिसतात. त्यामुळे पर्यटक येथे येत असतात.
जलाशयही आकर्षक
भीमकुंड, शक्कर तलाव, देवी तलाव, मछली तलाव, काला पाणी तलाव, मंकी पॉइंट आदी जलाशय.
तारांकित पर्यटक निवासाची सुविधा
^चिखलदरा येथे येणाऱ्या पर्यटकांच्या निवासाची व्यवस्था उत्तम व्हावी, यासाठी तारांकित पर्यटक निवास बांधले आहे. त्याचा पर्यटकांनी लाभ घ्यावा.- क्षीप्रा बोरा, वरिष्ठ प्रादेशिक व्यवस्थापक